advertisement

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय, जालन्यात पार पडला पहिला आदर्श विवाह

Last Updated:

Ideal Marriage: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने विवाहाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालन्यात डॉक्टर दाम्पत्याचा पहिला आदर्श विवाह नुकताच संपन्न झाला.

+
वैष्णवी

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय, जालन्यात पार पडला पहिला आदर्श विवाह

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडा प्रथा आणि विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्यक खर्च यावर टीकेची झोड उठू लागली. यानंतर अहिल्यानगर इथे मराठा समाजाने विवाह सोहळ्यांसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर केली. या आचारसंहितेनुसार राज्यातील पहिला विवाह सोहळा परतूर येथे शिंदे परिवार आणि बागल परिवार यांच्यामध्ये संपन्न झाला. याच अनोख्या विवाह सोहळ्याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
परभणी येथील डॉ. जगदीश शिंदे आणि परतुर येथील डॉ. नक्षत्रा बागल यांचा साक्षगंध सोहळा परतूर येथे आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर दांपत्य असल्याने विवाह सोहळा आणि साक्षगंध सोहळा अत्यंत धूमधडाक्यात होणार होता. परंतु, साखरपुड्याआधी मराठा समाजातील लोकांनी एकत्रित एक बैठक बोलावली आणि या बैठकीत अहिल्यानगर येथे जाहीर झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पालनाविषयी चर्चा झाली. सगळ्यांच्या सहमतीने कमी पाहुण्यांमध्ये आणि अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुड्यातच विवाह सोहळा आटोपण्याचा ठरलं, असं नववधूचे भाऊ ॲड. विशाल बागल यांनी सांगितलं.
advertisement
लग्नात डीजे आणि जास्त पाहुणे देखील नव्हते. अशा पद्धतीने अत्यंत साध्या पद्धतीने या डॉक्टर दांपत्याचा विवाह सोहळा परतुर येथे संपन्न झाला. मराठा समाजाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार म्हणजेच केवळ 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत हुंडा न घेता आणि डीजे न लावता झालेल्या या विवाह सोहळ्याची संपूर्ण राज्यभर चर्चा होतीये. राज्यातील मराठा समाजाबरोबरच इतरही समाज घटक या विवाहसोहळ्याकडून प्रेरणा घेऊन लग्नातील अनावश्यक खर्च टाळतील, अशी अपेक्षा करूयात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय, जालन्यात पार पडला पहिला आदर्श विवाह
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement