Jalna Traffic: श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या वाटेवर, जालन्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna Traffic: श्री गजानन महाराज यांची पालखी परंपरेनुसार पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे जालन्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
जालना: श्री गजानन महाराज यांची पालखी परंपरेनुसार पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर आहे. या दिंडीमध्ये जवळपास 800 वारकरी सहभागी आहेत. ही पालखी 19 ते 21 जुलैदरम्यान जालना जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतील बदलांची माहिती घेणे गरजेचे आहे.
वाहतूक व्यवस्थेतील बदल
शनिवारी (ता. 19) सकाळी आठ ते रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाखालून व बाजूने अंबडकडे येणारी अवजड वाहने थांबवून ही वाहने पाचोड-अंबड मार्गेजालन्याकडे जातील. तर जालन्याकडून शहागडकडे जाणारी वाहने अंबड पाचोड मार्गे जातील.
रविवारी (ता.20) सकाळी तीन वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाखालून व बाजुने अंबडकडे येणारी सर्व अवजड वाहने थांबवून पाचोड जामखेड फाटा-जामखेड-किनगाव चौफुली-बदनापूर मार्गे जालनाकडे जातील. जालनाकडून येणारी वाहने बदनापूर-किनगाव चौफुली पाचोड मार्गे शहागडकडे जातील. शहापूर ते शहागड व अंबड ते पाचोड मार्गावरील गावातील अवजड वाहनांनी याच मार्गाचा वापर करावा. तसेच पारनेर फाटा ते छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंतच्या गावातील अवजड वाहनांनी याच मार्गाचा वापर करावा.
advertisement
सोमवारी (ता. 21) पहाटे तीन ते रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाखालून व बाजूने अंबडकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करून ही वाहने वडीगोद्री-पाचोड जामखेड फाटा-जामखेड-किनगाव चौफुली-बदनापूरमार्गे जालनाकडे जातील. जालन्याकडून येणारी वाहने बदनापूर-किनगाव चौफुली जामखेड-जामखेड फाटा पाचोड मार्गे शहागडकडे जातील. तसेच अंबडकडून जालन्याकडे जाणारी अवजड वाहने पहाटे तीन ते रात्री 11 वाजेदरम्यान बंदी असून ही वाहने किनगाव चौफुली-बदनापूर मार्गे जालनाकडे जातील. जालनाकडून अंबडकडे येणारी अवजड वाहने बदनापूर-किनगाव चौफुली-जामखेड-पाचोड शहागडकडे जातील.
advertisement
पोलिस अधीक्षक यांचे आदेश
view comments19 ते 21 जुलै या कालावधीत जालनाकडून घनसावंगीकडे जाणारी वाहने रोहनवाडी-सुतगिरणी मार्गे घनसावंगीकडे जातील व घनसावंगीकडून जालनाकडे जाणारी वाहने याच मार्गे जालनाकडे जातील. घनसावंगीकडून बीडकडे जाणारी वाहने तीर्थपुरी-गोंदी-शहागड मार्गे बीडकडे जातील, असे आदेश पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jul 15, 2025 1:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna Traffic: श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या वाटेवर, जालन्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल








