कडाक्याच्या उन्हात पक्ष्यांची अन्न पाण्यासाठी भटकंती, जालन्यातील तरुणाने सुरू केला मोफत अनोखा उपक्रम, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कडाक्याच्या उष्णतेत प्राणी आणि पक्षी यांना अन्न पाण्यासाठी प्रचंड भटकंती करावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन जालना शहरातील प्रतीक गावडे या तरुणाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
जालना : उन्हाचा कडाका आता प्रचंड वाढला आहे. या कडाक्याच्या उष्णतेत प्राणी आणि पक्षी यांना अन्न पाण्यासाठी प्रचंड भटकंती करावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन जालना शहरातील प्रतीक गावडे या तरुणाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरणीय सामाजिक समतोल राखण्यासाठी पक्ष्यांनाही लागते तहानभूक या उपक्रमांतर्गत जालना शहरातील विविध भागांत 100 बर्ड फीडर (अन्न व पाण्याची सोय असणारे) किट वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
advertisement
एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा 40 अंशापार गेला असून उन्हामुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी बाहेर फिरणे टाळत आहेत. मात्र, पशुपक्षी या मुक्या प्राण्यांचे या काळात हाल होत आहेत. त्यांच्यासाठी अन्नपाण्याची व्यवस्था विविध ठिकाणी व्हावी, यासाठी रेनिल या सामाजिक संघटनेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. अन्न तसेच पाणी दोन्ही एकत्र राहावेत यासाठी विशेष किट मागवून तयार करण्यात आले आहे. दोन महिने ही मोहीम चालू राहणार आहे.
advertisement
वाढती उष्णता लक्षात घेता पक्ष्यांना पाणी आणि खाद्य याची उणीव भासू नये, यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार गतिविधींमुळे शरीर ते सहन करू शकत नाही. वन्यप्राणी तसेच पशुपक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचत आहेत. अशा वेळी त्यांचा बळी जाण्याची भीती असते. अशा प्रकारे पक्ष्यांच्या अन्नपाण्यासाठी किट तयार करण्यात आल्या असून, मोफत वाटप केल्या जात आहेत. हातभार लावायचा असल्यास पक्षी मित्रांनी पुढाकार घ्यावा सुरक्षेची, आरोग्याची काळजी घ्यावी, बर्ड फीडरची योग्य काळजी घेण्यासाठी नियमितपणे साफसफाई करणे, योग्य ठिकाणी ठेवणे, पक्षी आणि इतर प्राण्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे आवश्यक आहे.
advertisement
मांजर तसेच इतर प्राण्यांच्या वावरापासून किट दूर ठेवावे, बियाणे तसेच पाण्याची साफसफाई करावी, पक्ष्यांसाठी योग्य अन्न निवडा, फीडरची काळजी घ्या या नियम अटी पक्षिमित्र ज्ञानेश्वर गिराम यांच्या सल्ल्यानुसार देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात अन्न, पाणी अशी दोन्ही मिळून एकत्र असलेल्या 100 किट्स वाटप करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये हातभार लावायचा असल्यास पक्षी मित्रांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन प्रतीक गावडे यांनी केलं आहे.
advertisement
view comments
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 12, 2025 6:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
कडाक्याच्या उन्हात पक्ष्यांची अन्न पाण्यासाठी भटकंती, जालन्यातील तरुणाने सुरू केला मोफत अनोखा उपक्रम, Video









