Success Story : आई-वडिलांचं छत्र हरवलं, आयुष्याशी जिद्दीनं लढला, अमरावतीचा तेजस झाला PSI

Last Updated:

वयाच्या 13 व्या वर्षी आईला गमावले त्यानंतर 2 वर्षांनी बाबांची सुद्धा साथ सुटली. आयुष्यात अनेक प्रसंग आलेत. संकट आलीत त्यातून पळून न जाता मनात जिद्द ठेवून तेजस अजूनही परिस्थिती आणि मनस्थितीशी लढत आहे.

+
News18

News18

अमरावती : अमरावतीमधील तेजस साबळे या विद्यार्थ्यांची 2024 मधील MPSC कंबाईन परीक्षेच्या अंतिम निकालात PSI पदी निवड झाली आहे. याआधी सुध्दा त्याची MPSC मार्फत 8 ते 9 पदांसाठी निवड झालेली होती. त्याचा संघर्ष खूप मोठा आहे. वयाच्या 13 व्या वर्षी आईला गमावले त्यानंतर 2 वर्षांनी बाबांची सुद्धा साथ सुटली. आयुष्यात अनेक प्रसंग आलेत. संकट आलीत त्यातून पळून न जाता मनात जिद्द ठेवून तेजस अजूनही परिस्थिती आणि मनस्थितीशी लढत आहे. पुढेही त्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
आपल्या जीवनातील संघर्ष लोकल 18 सोबत शेअर करताना तेजस सांगतो की, मी इयत्ता सातवीला असताना आई सोडून गेली. त्यानंतर इयत्ता नववीला असताना बाबा सुद्धा सोडून गेले. त्यानंतर पोरका झालेलो मी काही दिवस या नातेवाईकांकडे तर काही दिवस त्या नातेवाईकाकडे राहत होतो. त्यांच्या कामानुसार ते मला ठेवत होते. ही परिस्थिती माझ्या मामीला माहीत होती. आई वडिलांनंतर मामीच एक मला जीव लावणारी होती. तिने माझ्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न केले. माझ्यात शिक्षणाची ओढ निर्माण केली. पण, आजारपणामुळे ती सुद्धा मला सोडून गेली. आयुष्यात काहीही उरलेलं नसताना मी जगात होतो.
advertisement
पण, माझी मनस्थिती माझ्या प्रविण ठाकरे दादाला माहीत होती. माझ्या त्याकडू आठवणी आणि इतर मनस्थिती बघून त्याने मला नंतर अमरावतीमधील बालगृहात आणले. त्यानंतर माझा वेगळा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मला शिक्षणात तर्पण फाउंडेशनने मदत केली. आणि इतरही शिक्षक आणि मित्र मदत करत होते. पण, त्यांनी केलेली मदत मला कुठेतरी अपूर्ण पडत होती. त्यामुळे मी मग हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. वेटरशिप केली आणि त्यातून मिळालेल्या पैशात मी माझे क्लासेस करत होतो.
advertisement
आपण निवडलेला मार्ग खरचं योग्य आहे का? यातून आपण पुढे जाणार का? असे प्रश्न माझ्या मनात येत होते. पण प्रयत्न करून बघू. होईलच काही तरी, असा धीर देत मी मेहनत करत गेलो. MPSC मध्ये करिअर करायचं हे पक्क करून त्या दिशेने प्रयत्न सुरू केलेत. त्यानंतर माझ्या यशाला सुरूवात झाली. आता पर्यंत मी 8 पोस्ट काढलेल्या आहेत. सध्या मी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटला कॅनॉल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. याआधी वाशिमला होतो. आताही माझे प्रयत्न सुरूच आहे.
advertisement
मला तरुणांना एकच सांगावं वाटते की, अधिकारी होण हे स्वप्न असावं पण अंतिम ध्येय नसावं. कारण त्यामुळे आपलं यश हे मर्यादित राहत. आयुष्यात कधीही आशा सोडायची नाही, काहीही झालं तरी मेहनतीचे फळं हे आपल्याला नक्की मिळतेच, असे तेजस सांगतो.
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : आई-वडिलांचं छत्र हरवलं, आयुष्याशी जिद्दीनं लढला, अमरावतीचा तेजस झाला PSI
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement