185 झाडांची लागवड अन् वर्षाला लाखात कमाई, सोलापुरातील शेतकरी करतोय 15 वर्षांपासून फायद्याची शेती, Video

Last Updated:

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अंकोली या गावात राहणारे शेतकरी भैरवनाथ पवार हे गेल्या पंधरा वर्षांपासून लिंबाची शेती करत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी लावलेल्या या बागेतून दरवर्षी 2 ते अडीच लाख रुपयांचा नफा मिळत आहे.

+
लिंबू
title=लिंबू शेतीतून वर्षाला कमवतोय दोन ते अडीच लाखांचा नफा

/>

लिंबू शेतीतून वर्षाला कमवतोय दोन ते अडीच लाखांचा नफा

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अंकोली या गावात राहणारे शेतकरी भैरवनाथ पवार हे गेल्या पंधरा वर्षांपासून लिंबाची शेती करत आहेत. त्यांनी लिंबाच्या बागेतून भरघोस कमाई केली आहे. पंधरा वर्षांपूर्वी लावलेल्या या बागेतून दरवर्षी 2 ते अडीच लाख रुपयांचा नफा त्यांना मिळत आहे.
भैरवनाथ पवार यांनी पंधरा वर्षांपूर्वी एका एकरात लिंबाची लागवड केली होती. एका एकरात भैरवनाथ पवार यांनी 185 लिंबाच्या रोपांची लागवड केली आहे. अंकोली या गावात शेतकऱ्यांचा एटीएम कार्ड म्हणून लिंबूला संबोधले जाते. शेतमजुरांची रोजंदारी देण्यासाठी दोन ते तीन डाग लिंबाची तोड केल्यास शेतमजुरांचे पगार यातून निघते. तसेच कुठलीही परिस्थिती आली तर लिंबाची तोडणी करून आपण ते बाजारात विकल्यास संध्याकाळपर्यंत लिंबाची पट्टी शेतकऱ्यांच्या हातात येते. म्हणून अंकोली या गावात लिंबाची लागवड करतात. त्याला एटीएम प्रमाणे वापर करतात.
advertisement
सध्या उन्हाळा सुरू असून लिंबूची मागणी वाढली आहे. बाजारात लिंबूची किंमत 90 रुपये ते 120 रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहे.  शेतकरी भैरवनाथ पवार यांना लिंबू विक्रीतून वर्षाला 2 ते अडीच लाख रुपये मिळत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे दोन ते चार एकर शेती आहे त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी एका एकरात जरी लिंबूची लागवड केल्यास आर्थिक उत्पन्न वाढेल असा सल्ला शेतकरी भैरवनाथ पवार यांनी दिला आहे.
advertisement
लिंबासाठी बाजार शोधावा लागत नाही. व्यापारी त्यांच्या शेतातून लिंबू खरेदी करतात. शेतातूनच 90 ते 100 रुपये किलो दराने लिंबू विकला जातो. एका एकरांवर लिंबू लागवड करण्यासाठी 45 हजार रुपये खर्च करून शेतकरी भैरवनाथ पवार दरवर्षी 2 ते अडीच लाख रुपये मिळवत आहेत.
एकदा लागवड 25 वर्षे उत्पन्न
लिंबाची एकदा लागवड केली की 25 वर्षे त्यापासून नफा मिळतो. लिंबाच्या बागेत जास्त कीटकनाशके वापरण्याची गरज नाही. कारण लिंबावर रोगांचा धोका कमी असतो. लिंबाची रोपे शेतात पूर्वेकडून पश्चिमेकडे लावावीत, त्यामुळे त्यांना हवा आणि पुरेसा प्रकाश मिळेल, त्यामुळे झाडांची वाढ लवकर होईल.
मराठी बातम्या/कृषी/
185 झाडांची लागवड अन् वर्षाला लाखात कमाई, सोलापुरातील शेतकरी करतोय 15 वर्षांपासून फायद्याची शेती, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement