जमीन नावावर करून दिली नाही, जन्मदात्या बापासोबत लेक अन् सुनेनं असं केलं, तुम्हालाही येईल संताप!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna News: जालन्यात पोटच्या मुलानंच वडिलांना मारहाण करत घराबाहेर काढलं आहे. जमीन नावावर करून देण्यात नसल्याने हा धक्दकादक प्रकार झाल्याचे पुढे आले आहे.
जालना: लोभापायी माणूस कोणत्या थराला जाईल काहीच सांगता येत नाही. वडील शेतजमीन आपल्या नावावर करून देत नाहीत म्हणून चक्क जन्मदात्या बापाला मुलगा आणि सुनेनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना घराबाहेर काढल्याचा दुर्दैवी प्रकार जालना जिल्ह्यातील अवघडराव सावंगी येथे घडला आहे. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघडराव सावंगी येथील विठ्ठल कुंडलिक गावंडे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलींची लग्ने झाली असून, त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. विठ्ठल गावंडे यांच्याकडे एकूण अडीच एकर शेतजमीन होती. यापैकी दीड एकर जमीन त्यांनी यापूर्वीच मुलगा आरोपी सागर गावंडे याच्या नावावर तर राहते घर सुनेच्या नावावर केले आहे.
advertisement
विठ्ठल गावंडे यांच्या नावावर शिल्लक असलेली एक एकर शेतजमीन तातडीने आपल्या नावावर करून द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला. वडिलांनी शेती नावावर करण्यास नकार देताच, संतप्त झालेल्या मुलगा व सुनेने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना घरातून हाकलून दिले, असा आरोप विठ्ठल गावंडे यांनी केला आहे.
advertisement
या घटनेनंतर गेल्या दोन महिन्यांपासून हे वृद्ध वडील बाहेरच आपला उदरनिर्वाह करत आहेत. अखेरीस त्यांनी पोलिसांत धाव घेतली. विठ्ठल गावंडे यांच्या तक्रारीवरून पारध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 06, 2025 1:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जमीन नावावर करून दिली नाही, जन्मदात्या बापासोबत लेक अन् सुनेनं असं केलं, तुम्हालाही येईल संताप!


