तब्बल 405 किमी मॅरेथॉन 10 दिवसांत केली पूर्ण, जालन्याच्या धावपटूचा सैन्याकडून विशेष सन्मान, Video

Last Updated:

भारतीय सैन्याने यावर्षी पहिल्यांदाच ही अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली होती. ही मॅरेथॉन जितेंद्र अग्रवाल यांनी पूर्ण केली.

+
जितेंद्र

जितेंद्र अग्रवाल प्रशस्तीपत्र आणि पदकासह

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : 1971 मध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या अतुलनीय विजयानिमित्त भारतीय सैन्य दलाच्या वतीने 16 डिसेंबर हा दिवस 'विजय दिवस' म्हणून भारतभर उत्साहात साजरा केला जातो. भारतीय सैन्याने 2024 मध्ये पहिल्यांदाच विजय दिनी 405 किमी अंतराची अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली. 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान झालेल्या या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये पंधरा स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये मराठवाड्यातून जितेंद्र अग्रवाल हे एकमेव होते. त्यांनी दहा दिवसांमध्ये 405 किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केल्याने लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन गौरव करण्यात आला.
advertisement
भारतीय सैन्याने यावर्षी पहिल्यांदाच ही अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली होती. भारतातील नवतरुणांना, युवतींना तसेच सर्वसामान्य नागरिकांना सेनेविषयी आपुलकी, आदर वृद्धिंगत व्हावा यासाठी या अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. मुंबई येथून 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी 15 धावपटूंना हिरवा झेंडा दाखवला. मुंबई ते नाशिक, नाशिक ते अहिल्यानगर, अहिल्यानगर ते पुणे असा 405 किमीचा प्रवास धावपटूंनी पूर्ण केला.
advertisement
दररोज 50 किमी अंतर धावपटू पूर्ण करायचे, यादरम्यान प्रत्येक शहरांमध्ये शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, अग्निवीर तसेच युवक-युवतींनी या धावपटूंचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आणि धावपटूंबरोबर धावण्याचा सराव देखील केला.
सर्व धावपटूंची व्यवस्था भारतीय सेनेमार्फत करण्यात आली. प्रत्येक शहरांमध्ये धावपटूंना धावण्यासाठी रस्ता मोकळा करण्यास किंवा त्यांच्यासाठी अत्यावश्यक असलेल्या चहा, नाष्टा आणि अन्य बाबींची व्यवस्था करणे असो, त्याचबरोबर राहण्या-खाण्याची व्यवस्था देखील आर्मी कॅम्पमध्ये करण्यात आली. 16 डिसेंबर रोजी भारतीय सेनेच्या साऊदर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन जितेंद्र अग्रवाल यांचा सन्मान करण्यात आला.
advertisement
या 405 किमी अल्ट्रा मॅरेथॉनसाठी सातारा येथील प्रशिक्षक शिव यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन जितेंद्र अग्रवाल यांना मिळाले. त्याचबरोबर पुणे येथील आहार सल्लागार देवयानी निकम यांनी आहाराबद्दल योग्य मार्गदर्शन केले. तसेच पुणे येथील डीवायएसपी साईनाथ ठोंबरे यांनी अग्रवाल यांना सातत्याने प्रोत्साहन दिले.
'कुटुंबातील आई-वडिलांचे आशीर्वाद तसेच पत्नी शिल्पा अग्रवाल आणि मुलगा करण अग्रवाल यांच्या पाठिंब्यामुळेच मी ही अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो,' असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच जालना शहरातील फन रनर ग्रुप आणि फॅब रनर ग्रुप यांचा देखील अग्रवाल यांना सतत पाठिंबा आणि सहकार्य असते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
तब्बल 405 किमी मॅरेथॉन 10 दिवसांत केली पूर्ण, जालन्याच्या धावपटूचा सैन्याकडून विशेष सन्मान, Video
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement