महाकुंभला जाणाऱ्या भाविकांसाठी Good News, मराठवाड्यातून 12 विशेष रेल्वे, पाहा वेळ आणि तारीख
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
mahakumbh 2025: महाकुंभ पर्वासाठी मराठवाड्यातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. रेल्वेने 12 विशेष गाड्यांची सोय केली आहे.
जालना: हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा महाकुंभ तब्बल 144 वर्षानंतर प्रयागराज येथे होत आहे. या मेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक प्रयागराज येथे येत आहेत. मराठवाड्यातील भाविकांना देखील महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. मराठवाड्यातून प्रयागराज येथे जाण्यासाठी 12 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. याबाबत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती.
प्रयागराज येथे महाकुंभ पर्वात कोट्यावधी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने काटेकोर नियोजन केले आहे. देशभरातील भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची देखील सोय करण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील भाविकांना देखील महाकुंभ पर्वात सहभागी होता यावे, म्हणून रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
मराठवाड्यातून 22 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत रेल्वे गाड्या टप्याटप्याने जाणार आहेत. प्रवासात अडचणी येऊ नयेत यासाठी रेल्वे विभागातर्फे आगाऊ - आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे भाविकांचा प्रवास सुखकर होणार असून भाविकांनी नियोजन करून सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेय.
advertisement
असं असणार वेळापत्रक
22 जानेवारी: नांदेड ते पटणा नांदेडवरून रात्री 11 वाजता सुटेल.
25 जानेवारी: काचीगुडाते पटणा मार्गे नांदेड गाडी काचीगुडा दुपारी 4.45 वाजता सुटेल
7 फेब्रुवारी: सिकंदराबाद ते पाटणा मार्गे नांदेड गाडी सिकंदराबाद येथून संध्याकाळी 5 वाजता सुटेल
13 फेब्रुवारी नांदेड-पटणा गाडी नांदेडवरून रात्री 11 वाजता सुटेल.
19 फेब्रुवारी: छत्रपती संभाजीनगर - पटणा गाडी छत्रपती संभाजीनगर येथून संध्याकाळी 7 वाजता सुटेल.
advertisement
22 फेब्रुवारीः काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड गाडी काचीगुडा येथून दुपारी 4.45 वाजता सुटेल.
25 फेब्रुवारी: छत्रपती संभाजीनगर - पटणा.
24 जानेवारी: पटणा ते नांदेड पटण्यावरून 3.30 वा.
27 जानेवारी: पटणाते काचीगुडा मार्गे नांदेड गाडी पटणा येथून सकाळी 11.30 वा.
9 फेब्रुवारी: पटणा ते सिकंदराबाद मार्गे नांदेड गाडी पटणा येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल
advertisement
15 फेब्रुवारी: पटणा तेनांदेड गाडी पटणा येथून दुपारी 3.30 वा. व नांदेड येथे 17 रोजी 4.30 वा. दाखल
21 फेब्रुवारी: पटणाते छ. संभाजीनगर दु. 3.30 वा. 24 फेब्रुवारी: पटणाते काचीगुडा मार्गे नांदेड गाडी पटणा येथून सकाळी 11.30 वा.
27 फेब्रुवारी: पटणा तेछ. संभाजीनगर दु. 3.30 वा.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 21, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
महाकुंभला जाणाऱ्या भाविकांसाठी Good News, मराठवाड्यातून 12 विशेष रेल्वे, पाहा वेळ आणि तारीख









