भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर राहणार 4 दिवस बंद
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. जोतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे.
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे मंगळवार (ता. 21) ते शुक्रवार (ता. 24) या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. जोतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली व पुरातत्व विभाग, पुणे यांचेकडून मूर्तीची पाहणी करणेत आली होती व मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला होता.
वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थानची मूळ मूर्ती सुस्थितीत राहावी याकरिता देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुरातत्त्व विभागाला मूर्तीची पाहणी करण्याबाबत कळवले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभाग, दिल्ली व पुरातत्त्व विभाग, पुणे येथील तज्ज्ञांकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनंतर पुरातत्त्व विभागाने संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल दिला होता.
advertisement
अहवालानुसार, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांचे वतीने मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी महासंचालक, भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांना दि.03/01/2025 च्या पत्राने कळविले होते. त्यानुसार दि.17/01/2025 रोजी भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांचेकडील अधिकारी यांनी मूर्तीची पाहणी केली. पाहणीअंती भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली कडील अधिकारी व सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांनी देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर व गावकर प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थान मूर्तीची रासायनिक संर्वधन प्रक्रिया मंगळवार दि. 21/01/ 2025 पासून शुक्रवार दि.24/01/2025 अखेर करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
त्यामुळे जोतिबा देवाची मूळ मूर्तीचे मंगळवार दि. 21/01/ 2025 पासून शुक्रवार दि. 24/01/2025 अखेर दर्शन भाविकांना घेता येणार नाही, यास्तव भाविकांना सदर कालावधीमध्ये उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौक येथे ठेवणेत येणार असून, भाविकांनी याकालावधीत कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर व समस्त पुजारी वर्ग यांना सहकार्य करावे, अशी विनंती देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
Jan 20, 2025 5:54 PM IST









