Vande Bharat Express: आता जालना नाही नांदेडलाही थांबणार वंदे भारत ट्रेन, किती आहे तिकीट दर? Video

Last Updated:

मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जालना ते मुंबईपर्यंत असणारी वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत असणार आहे.

+
News18

News18

जालना: मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जालना ते मुंबईपर्यंत असणारी वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत असणार आहे. आज सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ट्रेनचं लोकार्पण करण्यात आलं होतं. लोकल 18 च्या प्रतिनिधीने ट्रेनमध्ये मिळणाऱ्या सोयी-सुविधांविषयी प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहुयात.
मी आज नांदेड ते मुंबई या वंदे भारत ट्रेनचा नांदेड येथून मुंबईपर्यंतचा प्रवास करत आहे. या ट्रेनमध्ये बसून खूप छान वाटते. विमानामध्ये बसल्यासारखा अनुभव आहे, असं मुंबई येथील प्रवासी परिणय मगरे यांनी सांगितलं.
वंदे भारत ट्रेन सुरू झाल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. नांदेडकरांची ही खूप दिवसांची मागणी होती. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे शिक्षणाचे, आरोग्याचे किंवा इतर कारणांसाठी मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे जाणं सोयीचे होणार असल्याचं नांदेड येथील एका प्रवाशाने सांगितलं.
advertisement
ट्रेनमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत. आम्हाला तर विमानात बसल्यासारखाच अनुभव येत आहे. ज्यांनी ज्यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचे आभार. त्यांनी नांदेडकरांसाठी या पद्धतीची सुपरफास्ट ट्रेन सुरू केली, अशी भावना राकेश सोळंके यांनी व्यक्त केली.
advertisement
ही आहेत ट्रेनची वैशिष्ट्ये
नांदेड ते मुंबई हे 610 किमी अंतर 9 तास 30 मिनिटांत कापता येणार
एसी चेअर कार तिकीट 1610
तर एक्सिक्युटीव्ह चेअर कार तिकीट 2930 रुपयांना
ट्रेनला असतील एकूण 20 कोच
1440 प्रवासी करू शकतील प्रवास
दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड असे असतील थांबे.
advertisement
27 ऑगस्टपासून ही वंदे भारत एक्सप्रेस नियमित सुरू होत आहे. सकाळी पाच वाजता ही ट्रेन नांदेड येथून निघणार असून परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई असे थांबे असणार आहेत. तर मुंबईवरून एक वाजून दहा मिनिटांनी ही ट्रेन निघणार असून नांदेड येथे दहा वाजेच्या सुमारास पोहोचणार आहे. बुधवारी नांदेड येथून तर गुरुवारी मुंबई येथून ही ट्रेन नसणार आहे. मराठवाड्यातील विशेषतः परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही ट्रेन प्रवासाचा एक सुखद अनुभव ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/जालना/
Vande Bharat Express: आता जालना नाही नांदेडलाही थांबणार वंदे भारत ट्रेन, किती आहे तिकीट दर? Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement