Success Story: महापालिका शाळा ते थेट जर्मनी, पुण्याच्या श्रावणीने मिळवली 8000000 रुपयांची शिष्यवृत्ती, Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हे सिद्ध केले आहे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या श्रावणी टोणगे हिने.
पुणे: जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हे सिद्ध केले आहे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या श्रावणी टोणगे हिने. श्रावणीची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) च्या रॉबर्ट बॉश महाविद्यालयात झाली आहे. तिच्या या प्रवासाबद्दल श्रावणीने लोकल 18 ला माहिती दिली.
महाराष्ट्रातून थेट जर्मनीत शिक्षणासाठी निवड
श्रावणी टोणगे हिची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) च्या रॉबर्ट बॉश महाविद्यालयात झाली आहे. 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात तिचा प्रवेश निश्चित झाला आहे. महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी म्हणून तिने शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळवली आहे. तिला 80 लाख शिष्यवृत्ती मिळाली आहे. आता श्रावणी अकरावी आणि बारावीसाठी जर्मनीत जाणार आहे.
advertisement
या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात ती विज्ञान, गणित आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करणार आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस ही संस्था जगभरातील विविध ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये चालवते आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि संधी प्रदान करते.
advertisement
महापालिकेच्या शाळेत मला फक्त शिक्षणच नाही, तर स्वप्न बघण्याची आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या यशामध्ये शिक्षकांचे सतत मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेचे सकारात्मक वातावरण यांचा मोठा वाटा आहे. UWC मध्ये शिकण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खरोखरच आयुष्य बदलणारे आहे, असे श्रावणीने सांगितले.
Location :
Pune (Poona) [Poona],Pune,Maharashtra
First Published :
Aug 26, 2025 5:21 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success Story: महापालिका शाळा ते थेट जर्मनी, पुण्याच्या श्रावणीने मिळवली 8000000 रुपयांची शिष्यवृत्ती, Video
title=महापालिका शाळा ते थेट जर्मनी, जाणून घ्या श्रावणी टोणगे हीचा संपूर्ण प्रवास







