Success Story: नोकरीच्या मागे न धावता निवडला व्यवसायाचा मार्ग, उभारली दूध डेअरी, महिन्याला 9 लाखांची उलाढाल

Last Updated:

उच्चशिक्षित एका तरुणाने नोकरीकडे न बघता आपला स्वतःचा दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात सगळाच शिक्षित तरुण वर्ग नोकरीच्या मागे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र स्पर्धा वाढल्याने सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे उच्चशिक्षित एका तरुणाने नोकरीकडे न बघता आपला स्वतःचा दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथील उच्चशिक्षित तरुण नचिकेत बागल हा 3 वर्षांपासून दूध डेअरीचा व्यवसाय करत आहे. दररोज 600 ते 650 लिटर दुधाचे संकलन त्यांच्याकडे केले जाते. तसेच या ठिकाणी दुधाची विक्री देखील केली जात असून या माध्यमातून महिन्यासाठी 8 ते 9 लाख रुपयांची उलाढाल होत असते. तर निव्वळ नफा 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याचे नचिकेतने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
लाडगावातील उच्चशिक्षित ग्रॅज्युएट झालेले तरुण नचिकेत आणि त्याचा भाऊ किशोर बागल या दोघांनी मिळून दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला. परिसरातील सर्व शेतकरी आपल्या गाय, म्हशींचे दूध या ठिकाणी देत असतात. दुधाच्या दर्जेदारपणानुसार त्याची किंमत ठरवली जाते. तसेच दुधामध्ये किती प्रमाणात पाण्याचा वापर केलेला आहे यासाठी त्या दुधाची चाचणी करण्यात येत असते. त्यानंतर त्या दुधाचा 50 ते 60 रुपये लिटर तसेच वेगवेगळ्या दराने पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. नागरिकांना घरगुती वापरासाठी लागणारे संकलन केलेल्या दुधातून 400 ते 500 लिटर दूध विक्री केले जाते असे देखील नचिकेतने सांगितले.
advertisement
दूध डेअरीचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास व्यावसायिकांनी सर्वप्रथम डेअरीसाठी जागा ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्या ठिकाणी वर्दळ राहील आणि सर्व शेतकरी व नागरिकांना येता येईल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story: नोकरीच्या मागे न धावता निवडला व्यवसायाचा मार्ग, उभारली दूध डेअरी, महिन्याला 9 लाखांची उलाढाल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement