जालनाकर लक्ष द्या! वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल, मोतीबाग रिंग रोड राहणार बंद
- Reported by:Kale Narayan
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जालना शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल केले आहेत.
जालना: राज्यभरात नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. 12 ऑक्टोबर रोजी विविध मंडळांनी स्थापन केलेल्या दुर्गामातांचे विसर्जन होणार आहे. या विसर्जन मिरणवणुकीला भाविकांची मोठी गर्दी असते. दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जालना शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल केले आहेत. शहरातील प्रमुख मार्ग असणारा मोतीबाग रिंग रोड बंद राहणार असून काठी ठिकाणी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवलीये.
जालन्यातील हा मार्ग बंद
जालना शहरात 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून नवदुर्गा माता देवी मूर्ती विसर्जनापर्यंत शहरात वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. गेडर टी पॉइंट ते अंबड चौफुली हा मार्ग बंद असून राजूर चौफुली मार्गे वाहने जातील. तर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मंमादेवी मार्गावरूनही वाहतुकीला राजमहल टॉकीच्या मार्गावरून वळवले आहे.
advertisement
वाहतूक मार्गात असा असेल बदल
जालन्यातील नियमित मार्ग छ. शिवाजी महाराज पुतळ्याकडून टांगा स्टॅण्ड, सराफा बाजार, पाणी वेस, सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी वाहतूक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहल टॉकीज समोरील पुलावरून एमएसईबी कार्यालय, मंमादेवी मंदिरकडून रेल्वे स्टेशन व जुना जालन्यात जाईल.
advertisement
जुना जालन्यातून नवीन जालन्यात येणारी वाहतूक ही याच मार्गाचा अवलंब करतील. सदर बाजार, रहेमान गंज, मुर्गी तलावाकडून मामा चौक, सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी वाहतूक ही जुना मोंढा कमान, दीपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कडकोट, शिश टेकडीमार्गे जाईल. तसेच जुना जालन्यातून नवीन जालन्यात येणारी वाहतूक सुद्धा याच मार्गाचा वापर करेल. हे आदेश 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून नवदुर्गा माता देवी मूर्ती विसर्जनापर्यंत लागू राहणार आहेत.
advertisement
संभाजीनगरकडून येणारी वाहतूक वळवली
view commentsछत्रपती संभाजीनगरकडून जालनामार्गे अंबड तसेच मंठ्याकडे जाणारी वाहतूक ही जालना, गेडर टी पॉईंट, राजूर चौफुली, नवीन मोंढा, कन्हैयानगर बायपास रोडने नाव्हा चौफुली, मंठा चौफुली व अंबड चौफुली मार्गे जाईल. याच मार्गाने परतीचा प्रवास करेल. तर याच मार्गावर राजूरकडन येणारी तसेच जाणारी वाहनेही धावणार आहेत.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Oct 09, 2024 12:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालनाकर लक्ष द्या! वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल, मोतीबाग रिंग रोड राहणार बंद










