सोलापूरकर मी तुला झोडणार, बाबासाहेबांवर वादग्रस्त वक्तव्य; आव्हाडांना राग अनावर

Last Updated:

कानाखाली जाळ काढला म्हणजे त्याच्या कानशिलात लावली तर याच्यातला मनुवाद बरोबर जागा होईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

News18
News18
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला.. का मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं वक्तव्य केलं. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत सोलापूरकरांना झोडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आम्ही जे वर्षानुवर्षे बोलतोय की मनुवाद्यांच्या डोक्यातलं चतुर्वान्यांच भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणाच असेल असं सोलापूरकर म्हणतोय त्याने बाबासाहेबांना ब्राह्मणही करुन टाकलं. आता त्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे त्याच्या कानशिलात लावली तर याच्यातला मनुवाद बरोबर जागा होईल . शिवाजी महाराजांबद्दल, बाबासाहेबांद्दल बोलायचं आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची काय गरज आहे.
advertisement

कोणी नाही मारलं तरी मी तुला झोडणार :जितेंद्र आव्हाड

सोलापूरकर तुला एवढं बोलायचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं आहे, गप्प आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे पण मागे घे आणि बाबासाहेबद्दलचे पण मागे घे ... कोणी नाही मारलं तरी मी तुला झोडणार, मी तुला मारणार ... बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. लोकांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या, तू थेट त्यांना ब्राह्मण करतो आणि आरे तुरे करतो, तुझी लायकी आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
advertisement

सोलापूरकर जे काय बोललाय, बरळलाय यातून फक्त वाद निर्माण होऊ शकतात : जितेंद्र आव्हाड

कुठल्या एका चित्रपटामध्ये भूमिका केली म्हणून तू काय अमिताभ बच्चन झालास का? सोलापूरकर जे काय बोललाय, बरळलाय यातून फक्त वाद निर्माण होऊ शकतात. यातून फक्त माथी भडकू शकतात आणि माथी भडकणार आणि याला जन्माची अद्दल शिकवणार,असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूरकर मी तुला झोडणार, बाबासाहेबांवर वादग्रस्त वक्तव्य; आव्हाडांना राग अनावर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement