सरदारसोबत शिल्पा शेट्टीचं अफेअर, कळताच पती राज कुंद्राने केलं असं काही... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shilpa Shetty-Raj Kundra : नुकतंच शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राबद्दल असं काहीतरी सांगितलं आहे की, ते ऐकून कोरिओग्राफर फराह खानही थक्क झाली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते, पण यावेळी ती तिच्या एका वेगळ्याच वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिने पती राज कुंद्राबद्दल असं काहीतरी सांगितलं आहे की, ते ऐकून कोरिओग्राफर फराह खानही थक्क झाली.
राज कुंद्राने सोडलं होतं घर?
नुकतंच फराह खान शिल्पा शेट्टीच्या घरी तिचा व्लॉग शूट करण्यासाठी गेली होती. यावेळी फराहने शिल्पाला विचारले की, तिचा नवरा राज कुंद्रा कुठे आहे? यावर शिल्पाने हसत-हसत एक मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली, “माझे सध्या एका सरदारजींसोबत अफेअर चालू आहे, म्हणूनच त्याने ही बिल्डिंग सोडली आहे.” शिल्पाच्या या उत्तराने फराह खानच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले.
advertisement
त्यानंतर शिल्पाने लगेच खुलासा केला. ती म्हणाली, “खरे तर राज आता एक अभिनेता झाला आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटात एका सरदाराची भूमिका करत आहे.”
फराह खाननेही यावर गमतीने म्हटलं, “नवरा गेला आणि बॉयफ्रेंड आला!” यावर शिल्पाने हसत-हसत, “हो, तो माझा बॉयफ्रेंड आहे!” असं म्हटलं. त्यानंतर फराहने कॅमेऱ्यासमोर तिच्या नवऱ्याला उद्देशून म्हटलं की, “कधीतरी घराबाहेर पड, म्हणजे मी माझ्या बॉयफ्रेंडला घरी आणू शकेन!”
advertisement
राज कुंद्राचं अभिनयात डेब्यू
राज कुंद्राचा ‘मेहेर’हा पंजाबी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात त्याने सरदाराची भूमिका केली आहे. शिल्पाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून राज आणि चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. राज कुंद्राने २०२३ मध्ये 'UT69' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं.
advertisement
शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये राज कुंद्रासोबत लग्न केलं होतं. त्यांना विआन आणि समीशा अशी दोन मुलं आहेत. हे दोघंही नेहमीच एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सरदारसोबत शिल्पा शेट्टीचं अफेअर, कळताच पती राज कुंद्राने केलं असं काही... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा