पहिल्यांदाच जगासमोर आलं आमिर खानचं हिडन टॅलेन्ट, तुम्ही पाहिलं का? VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Aamir Khan Singing Video : आमिर खानचा गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या या नव्या कौशल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच त्याच्या अभिनयासाठी ओळखले जातो. पण, यावेळी तो त्याच्या अभिनयामुळे नाही, तर त्याच्या गायकीमुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो गाताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.
सुरेश वाडकर यांच्या अकादमीमध्ये सूर जुळले
आमिर खानचा हा व्हिडिओ प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या संगीत अकादमीच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडिओमध्ये आमिर एका गायिकेसोबत राग गाताना दिसत आहेत. त्यांनी घातलेले साधे कपडे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून असं वाटतं की, ते पूर्णपणे संगीतात रमून गेले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
advertisement
advertisement
लवकरच तीन खान येणार एकत्र?
दरम्यान, आमिर खानशी संबंधित आणखी एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यात एका सेटवर तीन व्हॅनिटी व्हॅन्स उभ्या आहेत, ज्यांच्यावर शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची नावं लिहिलेली आहेत. व्हिडिओ करणारी व्यक्ती म्हणते, "तिघे एकत्र… कोणता चित्रपट आहे भाई?" या व्हिडिओमुळे, चाहते गेली अनेक वर्षे वाट पाहत असलेली 'ती' इच्छा पूर्ण होणार का, अशी अटकळ बांधली जात आहे. तिन्ही खान पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार का, याबद्दल चर्चा सुरू आहेत.
advertisement
आर्यन खानच्या वेब सिरीजमध्ये एंट्री?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सिरीजमध्ये तिन्ही खान एकत्र दिसू शकतात. असं म्हटलं जातंय की, शाहरुख स्वतःचीच भूमिका साकारणार आहे आणि चित्रपटाचं नॅरेटर देखील तोच असणार आहे. तर सलमान आणि आमिर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या अपडेटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आणखी वाढला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 4:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पहिल्यांदाच जगासमोर आलं आमिर खानचं हिडन टॅलेन्ट, तुम्ही पाहिलं का? VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही