कोल्हापूर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर! महायुतीची पहिल्यांदाच सत्ता, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

Last Updated:

Kolhapur Election 2026 : कोल्हापूर महापालिकेसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडून ही सोडत जाहीर करण्यात आली आहे.

kolhapur Election 2026
kolhapur Election 2026
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडून ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ओबीसीचा महापौर होणार आहे.
कोल्हापूर आरक्षण निहाय संभाव्य चर्चेतील नावं कोणती?
सर्वसाधारण पुरुष - मुरलीधर जाधव, विजय खाडे-पाटील
महिला राखीव - माधुरी नकाते, रुपाराणी निकम
अनुसूचित प्रवर्ग - माधुरी व्हटकर, भाजप वैभव माने (शिवसेना),शिला सोनूले (शिवसेना)
ओबीसी - अश्कीन आजरेकर (शिवसेना)
पहिल्यांदाच महापालिकेत 'कमळ' जोमात
कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात यंदा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि सतेज पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रथमच भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने विजयाचा झेंडा फडकवला आहे. ८१ जागांच्या या महापालिकेत ४४ जागांसह महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्तांतर घडवून आणले आहे.
advertisement
महायुतीची विजयाची गणिते यशस्वी
या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र लढले होते. या त्रिकुटाने कोल्हापूरकरांना विकासाचा नवा चेहरा दिला. भाजपला २५, शिवसेनेला १५ तर राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. या एकत्रित ४४ जागांच्या बळावर महायुतीने बहुमताचा जादूई आकडा गाठला असून कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप प्रणीत सत्ता स्थापन होत आहे.
advertisement
सतेज पाटलांची चिवट झुंज पण 'शाहू आघाडी' ठरली निष्प्रभ
काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांनी शेवटपर्यंत निकराची झुंज दिली. काँग्रेसला ३५ जागा मिळवून देत त्यांनी आपली वैयक्तिक ताकद सिद्ध केली, मात्र सत्ता राखण्यासाठी ती अपुरी ठरली. धक्कादायक म्हणजे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), आप आणि वंचित आघाडीने मिळून बनवलेल्या 'शाहू आघाडी'ला एकाही जागेवर खाते उघडता आले नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
advertisement
निकालाचे महत्त्वाचे पैलू कोणते? 
सत्ता पालट - सतेज पाटील आणि शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची सत्ता गेली.
इतरांची स्थिती - जनसुराज्य शक्ती पक्षाने १ जागा जिंकली, तर अपक्षांचा पूर्णपणे सफाया झाला.
नवा महापौर -  आता कोल्हापूरच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजप प्रणित महायुतीचा चेहरा विराजमान होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर! महायुतीची पहिल्यांदाच सत्ता, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?
Next Article
advertisement
Mayor Reservation Lottery List: कोल्हापूरसह 8 जिल्ह्यांमध्ये OBC चा महापौर, 4 महानगरपालिकांमध्ये महिलांना संधी
Mayor Reservation: कोल्हापूरसह 8 जिल्ह्यांमध्ये OBC चा महापौर, 4 महिलांना संधी
  • २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार

  • या सोडतीने अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय गणित बिघडवले

  • नवीन चेहऱ्यांसाठी सत्तेची कवाडे उघडली आहेत.

View All
advertisement