बाबा सोडून गेले, आईनं मोठं केलं आज लेकीने राष्ट्रपती सुवर्णपदक मिळवलं, साईसिमरनची गोष्ट
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या विद्यार्थिनीला राष्ट्रपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे आपल्या मुलीने मिळवलेले यश पाहून आईचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला होता.
कोल्हापूर, 18 डिसेंबर : परिस्थिती विरोधात असली तरी आईचा पाठिंबा सोबत असताना जगही जिंकता येते. असेच काहीसे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या साईसिमरनने सिद्ध केले आहे. नुकत्याच शिवाजी विद्यापीठाचा 60 वा दीक्षांत समारंभ पार पडला. याच समारंभात मूळची सांगलीतील शिराळा येथील साईसिमरन घाशी या विद्यार्थिनीला राष्ट्रपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे आपल्या मुलीने मिळवलेले यश पाहून आईचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला होता.
साईसिमरन घाशी ही शिराळा येथे राहणाऱ्या हिदायत घाशी यांची मुलगी. साईसिमरन जेव्हा पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती तेव्हाच तिच्या वडिलांची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. यावेळी तिच्या आई शेहनाज यांच्यावर साईसिमरनसह तिच्या दोन भावांची सर्व जबाबदारी पडली. मात्र अपार कष्ट करून शेहनाज यांनी आपल्या तिन्ही मुलांना मोठे केले. साईसिमरन 8 वीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. मात्र आई आणि दोन्ही भावांनी तिचे शिक्षण थांबू दिले नाही. त्यामुळेच साईसिमरननेही जिद्दीने अभ्यास करुन दहावीत आणि बारावीतही नंबर मिळवला. त्यामुळेच आईची मान अभिमानाने उंचावली आहे.
advertisement
बारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेसाठी शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास कसा करावा? वाचा या महत्त्वाच्या टिप्स
..म्हणूनच राष्ट्रपती पदकासाठी निवड
साईसिमरन घाशी या विद्यार्थिनीने आजवरच्या आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत उत्तुंग यश संपादन केले आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता तिने साहित्य, कला, सामाजिक जाणिव अशा गोष्टींमधूनही आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तिच्या कवितेच्या आवडीमुळे स्वतःचे तिचे कविता संग्रह देखील प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान यामुळेच तिला अनेक ठिकाणी सन्मान देखील करण्यात आलेला आहे. मात्र राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मिळालेला सन्मान हा माझा नसून माझ्या आजवरच्या यशासाठी झटलेल्या माझ्या आईचा सन्मान आहे, असे मत साईसिमरन घाशी हिने व्यक्त केले आहे.
advertisement
साईसिमरनची आजवरची आजवरची कामगिरी
1) 16 व्या नॅशनल युथमध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय युवा संसदपटू म्हणून निवड
संसद स्पर्धा (नवी दिल्लीत सत्कार केला जाईल).
2) डी.जी.राठोड फाऊंडेशन आणि योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्स तर्फे राज्यस्तरीय सामाजिक कार्य पुरस्कार
3) युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र तर्फे सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार-2022
4) पंजाब, गोवा येथे झालेल्या परिषदा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर
advertisement
5) सलग 3 वर्षे शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात हिंदी वक्तृत्व स्पर्धेत मिळवली रँक
6) बी.ए. च्या सामान्य गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त 2022-23
7) Google Books आणि Kindle वर 3 वैयक्तिक कवितासंग्रह प्रकाशित असून 65 देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
8) सर्वोत्कृष्ट NSS स्वयंसेवक पुरस्कारने सन्मानित-2021-22
9) सांगली स्थित NGO सोबत मिळून तृतीयपंथी आणि वेश्या (LGBTQ) यांचे अधिकार आणि जागरूकतेसाठी काम.
advertisement
10) भारत सरकारद्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आयोजित विविध प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग
दहावीच्या विद्यार्थ्यांनो, गणित विषयाचं टेन्शन आलय? ‘या’ ट्रिक्स पाहा मार्क्स मिळवण्यासाठी होईल फायदा
तर आपल्या मुलीचा होत असलेला इतका मोठा सन्मान पाहून साई सिमरनच्या आई शहनाज घाशी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मला नातेवाईकांकडून साईसिमरनच्या लग्नाबद्दल सांगितले जायचे. मात्र मी तिच्यावर विश्वास ठेवून तिला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच तिने हे यश मिळवले आहे. देव करो आणि पुढचे सातही जन्म मला अशीच मुलगी मिळो, अशा प्रतिक्रिया शेहनाज घाशी यांनी दिल्या आहेत.
advertisement
दरम्यान राष्ट्रपती सुवर्णपदकाची कमाई केल्याने साईसिमरनने आपल्या परिवारासह गावचे नाव सर्व दूर पोहोचवले आहे. आपल्या आईचे कष्ट ओळखून अभिमानाने तिची मान उंचावल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 18, 2023 8:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
बाबा सोडून गेले, आईनं मोठं केलं आज लेकीने राष्ट्रपती सुवर्णपदक मिळवलं, साईसिमरनची गोष्ट