दहावीच्या विद्यार्थ्यांनो, गणित विषयाचं टेन्शन आलय? ‘या’ ट्रिक्स पाहा मार्क्स मिळवण्यासाठी होईल फायदा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पेपर सोडवत असताना गणित विषय न जमणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या ट्रीक्स जाणून घेणे गरजेचं आहे पाहा
वर्धा, 13 डिसेंबर : गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांचा नावडता विषय आहे. गणिताची आकडेमोड समजून घेणं अनेकांना कठीण जातं. त्यात दहावीची परीक्षा जवळ आली आहे. आणि गणित विषयाचं टेन्शन अनेक विद्यार्थ्यांना असतं. तर पेपर सोडवत असताना गणित विषय न जमणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या ट्रीक्स जाणून घेणे गरजेचं आहे. जेणेकरून पासिंग पेक्षा जास्त मार्क्स ते घेऊ शकतील. याबद्दलच वर्ध्यातील गणित शिक्षक राजेंद्र मीरापूरकर यांनी माहिती दिली आहे.
काय सांगतात मीरापूरकर सर?
विद्यार्थी मित्रांनो आपण दहावीच्या परीक्षेला यावर्षी 2024 मध्ये बसणार आहात. आणि आपल्या मनाला कठीण वाटतो असा एक विषय आहे गणित. जो मला काढायचा आहे आणि तो मला पास करायचाच आहे. या दृष्टीने आपण कसा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही बीजगणित आणि भूमिती या दोनही पेपर मधील प्रश्न पहिला हा सोडवलाच पाहिजे. तो अतिशय सोपा असतो. अजिबात त्याच्यावर काही कठीण प्रश्न रहात नाही. आणि तो प्रश्न जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला आठ दुणे 16 मार्क दोन्ही पेपर मिळून मिळू शकतात, असं राजेंद्र मीरापूरकर सांगतात.
advertisement
MBA Entrance Exams : केवळ CAT नाही, 'या' परीक्षा देऊनही मिळतो MBA ला प्रवेश! वाचा संपूर्ण माहिती
तसंच प्रश्न दोन मध्ये सुद्धा बारा मार्क असतात. ज्यांना गणित नाही येत त्या विद्यार्थ्यांनसाठी सांगतोय की त्यांनी नियमितपणे बोर्डाच्या पेपरमध्ये येणारे पहिला आणि दुसरा हे दोन्ही प्रश्न सोप्पे असतात. जसं पहिल्या B मध्ये चार प्रश्न आहेत ज्याचे उत्तर फक्त 2 किंवा 3 च ओळीत लिहायचे असतात. 2-3 ओळी लिहिल्या की 1 मार्क मिळतोच. तुम्ही चारही मार्क इथे कव्हर करू शकता. अशाप्रकारे तुम्हा ला8 मार्क मिळू शकतात. दुसऱ्या प्रश्नात पण ऍक्टिविटीमध्ये 2 गणित सोडवा त्याचीही तयारी करून ठेवा. 2+2= 4 मार्क मिळवा. त्यातच परत B मध्ये 5 गणित आहेत 5 मधली 4 गणिते सोडवायची असतात. तेही 2-2 गुणांची आहेत अशी 20 मार्क्स तुम्ही सहज घेऊ शकता. अशाप्रकारे नापास होणारे विद्यार्थी सरावाने गणित हा विषय सहज काढू शकतात. फक्त थोडा अभ्यास करावा, असंही राजेंद्र मीरापूरकर सांगतात.
advertisement
हे ठेवा लक्षात
एक विशेष म्हणजे पाहा की, मला एकदा प्रश्न येतो आहे परंतु त्याच्या मला स्टेप्स आठवत नाही तर म्हणून तो प्रश्न जेवढा येतो तेवढा सोडवा. गणितामध्ये प्रत्येक पायरीवर गुण असतात. समजा तीन मार्काचा प्रश्न आहे आणि तो येतोय पण मी मधात अडकलोय. तर अशावेळी जिथपर्यंत येते तिथपर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तेवढेच मार्क्स मिळतील पूर्ण प्रश्न सोडून देऊ नका जेवढा येतो तेवढा लिहिण्याचा प्रयत्न करा,अशी माहिती राजेंद्र मीरापूरकर यांनी दिली.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
December 13, 2023 1:27 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
दहावीच्या विद्यार्थ्यांनो, गणित विषयाचं टेन्शन आलय? ‘या’ ट्रिक्स पाहा मार्क्स मिळवण्यासाठी होईल फायदा