श्रीमंत शाहू छत्रपती महाराज घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट; कोल्हापूरहून जालन्याकडे रवाना

Last Updated:

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.

News18
News18
कोल्हापूर, 31 ऑक्टोबर, ज्ञानेश्वर साळोखे : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांच वेळ दिला होता, मात्र आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मात्र अजूनही सरकारला आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.
सकाळी साडेपाच वाजता श्रीमंत शाहू महाराज हे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जालना इथल्या अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज हे आज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
advertisement
दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती केली होती. जरांगे पाटील यांनी देखील संभाजीराजे यांचा मान राखत पाणी पिलं होतं. त्यानंतर देखील त्यांनी फोन करून जरांगे पाटील यांच्या तब्येतची चौकशी केली, तसेच त्यांना काळजी घेण्याचीही विनंती केली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट; कोल्हापूरहून जालन्याकडे रवाना
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement