Friendship : कोल्हापूरच्या महिलेवर चक्क फुलपाखराचं जडलंय मन! कुठेही गेली तरी सोडत नाही साथ
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Friendship : कोल्हापूर जिल्ह्यातील महिला आणि फुलपाखराची मैत्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 12 ऑगस्ट : मैत्रीच्या आपण अनेक कथा ऐकल्या अन् वाचल्याही असतील. मग ती भगवान श्रीकृष्ण अन् सुदामाची कथा असो की शोले चित्रपटामधील जय-वीरुची दोस्ती. याचप्रमाणे पक्षु-पक्षी आणि मानवाच्या मैत्रीच्या कथाही प्रसिद्ध आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याती शिरोळ तालुक्यात एका महिलेची चक्का इवलुशा फुलपाखराशी मैत्री झाली आहे.
शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीतील सध्या जम्मू काश्मीर येथे कार्यरत असणाऱ्या एका जवानाची पत्नी आणि फुलपाखरू यांची मैत्री परिसरातच नाही. तर सोशल मीडियावर याची चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. सैनिक पत्नी पुजा राहुल पाटील यांच्याशी अनेक दिवसांपासून एक फुलपाखरू जवळीक करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या डोक्यावर येऊन बसणे, मुद्दाम धडकून जाणे. असे प्रसंग कित्येक दिवस सुरू होते. पण पाटील यांनी तिकडे लक्ष दिले नव्हते. पण नंतर फुलपाखरू जाणीवपूर्वक आपल्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या फुलपाखराची चक्क मैत्री संबंध जोडले. यानंतर हे फुलपाखरू गेलच नाही. त्याने कायमचे पाटील यांच्याशी मैत्रीचे नाते जोडले. आता पाटील जिथे जातील तिथे फुलपाखरू सोबत असते. त्यामुळे पाटील व ते फुलपाखरू असे मैत्रीचे एक अतूट नाते तयार झाले आहे.
advertisement
Kolhapur : महिला आणि फुलपाखराच्या मैत्रीची गोष्ट pic.twitter.com/pCG2WoLmuy
— News18Lokmat (@News18lokmat) August 12, 2023
सारस पक्षी आणि तरुणाची मैत्री
काही दिवसांपूर्वी देशभरात सारस पक्षी आणि एका तरुणाच्या मैत्रीच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. उत्तर प्रदेशातील अमेठीतील एका 30 वर्षांच्या तरुणाचा मित्र हा कोणी माणूस नसून, उत्तर प्रदेशचा राज्यपक्षी सारस हा आहे. वास्तविक आरिफ नावाच्या या तरुणाने जखमी सारसला मदत केली होती. त्यानंतर आरिफ आणि सारसामध्ये मैत्रीचं घट्ट नातं तयार झालं. गेल्या सुमारे एक वर्षापासून सारस आरिफसोबत राहतो. आरिफ कुठेही गेला तरी सारस त्याचा सारथी बनून त्याच्याशी असलेलं मैत्रीचं नातं जपत आहे. आरिफ आणि सारस यांच्यातील मैत्री पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या नात्याचं उदाहरण देत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अमेठी जिल्ह्यातील जामो विकासखंडमधील मंडका गावातील रहिवासी आरिफसोबत सारस हा मित्र म्हणून राहत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये जखमी झालेल्या सारसाची जीवन-मरणाशी लढाई सुरू होती. अशा कठीण काळात आरिफने सारसाचा जीव वाचवला आणि पक्ष्यांविषयी असलेलं आपलं प्रेम दाखवून दिलं. जवळपास एक वर्षापासून सारस आरिफ आणि त्याच्या कुटुंबात एकोप्यानं राहतो.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 12, 2023 8:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Friendship : कोल्हापूरच्या महिलेवर चक्क फुलपाखराचं जडलंय मन! कुठेही गेली तरी सोडत नाही साथ