MSRTC : Free! Free!! Free!!! वर्षभर ST प्रवास फ्री, एसटी महामंडळाची खास भेट; फक्त करा 'हे' एकच काम

Last Updated:

MSRTC News : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 585 रुपयांत वर्षभर संपूर्ण राज्यात बस प्रवास करता येणार आहे.

News18
News18
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार साधारण 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 585 रुपयांमध्ये मोफत प्रवास करू शकतात. या योजनेचे नाव आहे 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' असे आहे.
या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरणे अधिक सोपे आणि परवडणारे होणे. योजना अंतर्गत लाभार्थ्यांनी फक्त 585 रुपये भरून एक स्मार्ट कार्ड तयार करावे लागते. हे स्मार्ट कार्ड मिळाल्यानंतर ते संपूर्ण वर्षभर राज्यभरातील एसटी बस सेवांमध्ये अमर्याद मोफत प्रवासासाठी वापरता येते.
585 रुपयांच्या पासवर कोणत्या बसमधून प्रवास करता येईल?
1)साधी एसटी बस
advertisement
2)शिवशाही बस
3)शिवशाही स्लीपर बस
4)शिवशाही शयन बस
5)शिवनेरी बस
स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी, लाभार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैध सरकारी फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्ज जवळच्या एसटी आगारात किंवा ऑनलाईन पोर्टलवरून करता येतो. अर्जाची ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद आहे.
महामंडळाने काही दिवसांपूर्वी महिलांसाठीही अर्ध तिकीट सवलत सुरू केली होती. त्या सवलतीसाठीही ओळखपत्र वापरले जाते. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक दोघांनाही सार्वजनिक वाहतुकीत प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि परवडणारा झाला आहे.
advertisement
एसटी स्मार्ट कार्डसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती?
1)आधार कार्ड
2)पॅन कार्ड किंवा अन्य सरकारी फोटो आयडी
3)स्मार्ट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया:
4)जवळच्या एसटी आगारात प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करणे.
ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज भरणे
योजना 75 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. फक्त 585 रुपये भरल्यास संपूर्ण वर्षभर अमर्याद प्रवास करता येतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि प्रवासी सवलत मिळते. जर आपल्या कुटुंबात वयोवृद्ध सदस्य असतील तर ही योजना लवकर अर्ज करून फायदा घेणे योग्य ठरेल. ही योजना केवळ प्रवासाची सुविधा देत नाही तर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान वाढवण्याचे कामही करते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MSRTC : Free! Free!! Free!!! वर्षभर ST प्रवास फ्री, एसटी महामंडळाची खास भेट; फक्त करा 'हे' एकच काम
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement