Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण; बोलताना भावुक, कुटुंबीयांना अश्रू अनावर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ritesh Deshmukh : अभिनेते रितेश देशमुख यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना आपल्या काकांचं उदाहरण दिलं आहे.
लातूर, (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज पार पडत आहे. यावेळी बोलताना अभिनेते रितेश देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना काका पुतण्याचं नातं कसं असावं याचंही उदाहरण त्यांनी दिलं. यावेळी बोलताना ते भावुक झालेले पाहायला मिळाले.
आमच्यावर आजोबांचे संस्कार : रितेश देशमुख
रितेश देशमुख म्हणाले, की माझे वडील मुख्यमंत्री झाले तरीही आमचे आजोबा काही चुकलं तरी सांगत होते. एकदा लातूरला असताना साहेब आजोबांची चौकशी करण्यासाठी घरी आले होते. तेव्हा आजोबांनी एक पेपरमधील बातमी साहेबांना वाचायला दिली. त्यात एक वाक्य वैयक्तीक टीका होती. हे होता कामा नये, असं आजोबांनी त्यांना सांगितलं. राजकारणात तुम्ही टीका करा. पण, ती वैयक्तिक असू नका. विरोध करा. पण, कुठल्याही व्यक्तिवर वैयक्तीक टीका करू नये. साहेबांची खूप भाषणे गाजली. पण, त्यांनी कधीही कुणावर वैयक्तिक टीका करू नये. हाच वारसा आम्हाला वडिलांकडून मिळाला आहे. हेच संस्कार आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याचं राजकारण पाहिलं तर भाषेची पातळी पाहून दुःख होते.
advertisement
मुख्यमंत्री झाले तेव्हा देवळात न जाता त्यांनी आजोबांच्या पायावर डोकं टेकवलं. त्यावेळी जाहीर सभेत बोलताना साहेबांना गहीवरुन आलं. त्यांचं भाषण मध्येच थांबलं. उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. काय करावं कुणालाही कळेना. त्यावेळी काकांनी उठून कमोन यू कॅन डू इट म्हणत समर्थन दिलं. एका भावाने दुसऱ्यासोबत कसं वागलं पाहिजे, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
advertisement
साहेब आणि काका दिलीप देशमुख यांनी कायम भावाचं नातं जपलं. आपण विचार करतो, की आपल्या भावाकडून आपल्याला काय मिळेल? पण, यांच्यामध्ये आपण भावाला काय देऊ शकतो? हिच भावना या दोघांनी आतापर्यंत जपली आहे. यावेळी बोलताना रितेश देशमुख यांना अश्रू अनावर झाले. साहेबांना जाऊन 12 वर्षे झाली. आजही त्यांची उणीव भासते. यावेळी मोठे बंधू अमित देशमुख यांनी मागे येऊन रितेश देशमुख यांच्या पाठीवर हात ठेवला. यावेळी आई वैशाली देशमुख, दिलीपराव देशमुख यांनाही गहीवरुन आलं होतं.
advertisement
काका पुतण्याचं नातं कसं असावं..
रितेश देशमुख म्हणाले, काका (दिलीपराव देशमुख) मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे, याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर आहे. साहेबांनी आम्हाला नेहमी स्वतंत्र दिलं. त्यांनी फक्त आम्हाला एकच गोष्ट सांगितली होती की तुम्ही शिक्षण घ्या. आम्ही तिघेही भाऊ उच्चशिक्षित झालो आहोत. मुलांवर कधीही दबाव टाकू नये. मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्यावे, आपण फक्त त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, अशीच शिकवण आम्हाला साहेबांनी दिल्याचं रितेश देशमुख यांनी सांगितलं.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Feb 18, 2024 1:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण; बोलताना भावुक, कुटुंबीयांना अश्रू अनावर








