Congress : मोठी बातमी! अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नवी दिल्ली, प्रतिनिधी : कमलनाथ यांच्यासोबतच काँग्रेस नेते मनीष तिवारी हे देखील काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र मनीष तिवारी यांच्या निकटवर्ती असलेल्या काँग्रेस नेत्यानं ही शक्यता फेटाळून लावली आहे. मनीष तिवारी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी ही निराधार असल्याचं काँग्रेस नेत्यानं म्हटलं आहे. मनीष तिवारी हे भाजपच्या संपर्कात असून, भाजपच्या तिकिटावर लुधियाना लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र दुसरीकडे मनीष तिवारी यांच्या कार्यालयानं या बातमीमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात मनीष तिवारी यांच्या कार्यालयानं निवेदन जारी करताना म्हटलं आहे की, मनीष तिवारी यांच्या भाजप संदर्भातील सर्व बातम्या निराधार आहेत. मनीष तिवारी हे आपल्याच लोकसभा मतदारसंघातून असून, ते विकास कामांचा आढावा घेत आहेत. शनिवारी ते आपल्या एका कार्यकर्तांच्या घरी थांबले होते.
advertisement
कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘काँग्रेसमध्ये मी एकच कमल आहे’ असं आपल्या नावाचा उल्लेख करताना एकदा काँग्रेस नेते कमलनाथ यांनी गंमतीमध्ये म्हटलं होतं. कमळ हे भाजपचं निवडणूक चिन्ह आहे. कमनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जर ही शक्यता खरी ठरली तर मध्यप्रदेशच्या राजकारणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. कमलनाथ यांनी 1980 साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत कमलनाथ कायम काँग्रेस आणि गांधी परिवारासोबत राहिले आहेत, त्यांनी इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांच्यासोबत काम केलं आहे. तसेच गांधी कुटुंबाचे विश्वासू अशी देखील त्यांची ओळख आहे.
advertisement
कमलनाथ काँग्रेसवर का आहेत नाराज?
समोर येत असलेल्या माहितीनुसार कमलनाथ यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा होती. मात्र काँग्रेसकडून यावेळी राज्यसभेच्या उमेदवारीची संधी अशोक सिंह यांना देण्यात आली. अशोक सिंह हे कमलनाथ यांचे पक्षांतर्गत स्पर्धक दिग्विजय सिंह यांच्या जवळचे आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ हे आजारी देखील आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलाचं राजकीय भविष्य मजबूत बनाव अशी त्यांची इच्छा असू शकते. काँग्रेसकडून ज्या पद्धतीनं सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे, त्यावर देखील कमलनाथ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Feb 18, 2024 12:36 PM IST
मराठी बातम्या/देश/
Congress : मोठी बातमी! अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा






