बस कंडक्टर आणि प्रवासी महिलेमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, लातूरमधील Video व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
महिलांमधील भांडण, हाणामारीच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी मॉलमध्ये, ट्रेन, बस, रस्त्यावर कुठेही महिलांचे भांडतानाचे व्हिडीओ समोर येत असतात.
सचिन सोळुंके, लातूर, 30 जुलै : महिलांमधील भांडण, हाणामारीच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी मॉलमध्ये, ट्रेन, बस, रस्त्यावर कुठेही महिलांचे भांडतानाचे व्हिडीओ समोर येत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडण झालं. एवढंच नाही तर भांडण हाणामारीपर्यंतही पोहोचलं.
सध्या दोन महिलांचा समोर आलेला व्हिडीओ लातूरचा आहे. लातूरमध्ये बस कंडक्टर आणि प्रवासी महिलेमध्ये बाचाबाची झाली. हे प्रकरण एवढं वाढलं की ते मारामारीपर्यंत पोहोचलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बससमोर भरपूर गर्दी आहे. दोन महिला जोरजोरात भांडत आहेत. बस कंडक्टर आणि प्रवासी महिलेत हे भांडण सुरु आहे. प्रवासी महिला जोरानं बस कंडक्टर महिलेच्या कानाखाली मारत आहे तर कंडक्टर महिला स्वतःचा बचाव करत आहे. कोणत्या तरी कारणावरुन दोघींमध्ये हे जंगी भांडण पेटलं असून दोघींची फ्री स्टाईल हाणामारी सुरु आहे. व्हिडिओ व्हायरल होत आहे मात्र भांडणाची अधिकृत माहिती समोर आली नाही.
advertisement
लातूरच्या बस स्थानकात महिला वाहक आणि प्रवासी महिलेमध्ये फ्री स्टाईल हाणामारी#latur #fightvideo #news18marathi pic.twitter.com/Sa7wCwYsmu
— News18Lokmat (@News18lokmat) July 30, 2023
दरम्यान, महिलांच्या भांडणांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. कधी केस पडकडून, खाली पाडून महिला फ्री स्टाईल हाणामारी करतात. यापूर्वीही अनेक प्रकरणे, व्हिडीओ व्हायरल झाली आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 30, 2023 11:21 AM IST








