अजब प्रेम कहाणीचा गजब अंत! लपून कोर्ट मॅरेज केलं पण एकत्र राहण्याआधीच पुजाचं मन बदललं; घटस्फोटासाठी पुण्यातील पत्नीनंच दिले पतीला पैसे
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रेमात पडल्यानंतर त्यांनी घरच्यांच्या विरोधाची भीती असल्याने १९ एप्रिल २०२४ रोजी पळून जाऊन कायदेशीर विवाह केला. मात्र, लग्नानंतर 'साथिया' चित्रपटाप्रमाणे दोघेही आपापल्या घरी राहू लागले
पुणे : घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये सहसा पत्नी पतीकडून पोटगी किंवा खर्च मागते, हे आपण नेहमी पाहतो. मात्र, पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात एक उलट आणि चकीत करणारी घटना घडली. सुखी संसाराचे स्वप्न पाहून पळून जाऊन लग्न केलेल्या एका तरुणीला, घटस्फोट मिळवण्यासाठी चक्क आपल्या पतीला ५० हजार रुपये द्यावे लागले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पूजा आणि संकेत (नावे बदललेली) हे वेगवेगळ्या जातीचे तरुण-तरुणी एकाच परिसरात राहत होते. प्रेमात पडल्यानंतर त्यांनी घरच्यांच्या विरोधाची भीती असल्याने १९ एप्रिल २०२४ रोजी पळून जाऊन कायदेशीर विवाह केला. मात्र, लग्नानंतर 'साथिया' चित्रपटाप्रमाणे दोघेही आपापल्या घरी राहू लागले. जेव्हा मुलीने घरी लग्नाबद्दल सांगितले, तेव्हा तिच्या घरून तीव्र विरोध झाला. घरच्यांच्या दबावापुढे झुकलेल्या पूजाने अखेर संकेतसोबत राहण्यास नकार दिला आणि न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.
advertisement
पतीने लावली 'ही' अट
संकेत मात्र पूजाला नांदवायला तयार होता. न्यायालयाने त्यांचे समुपदेशन केले, पण पूजा आपल्या निर्णयावर ठाम होती. अखेर संकेतचे वकील ॲड. नीता भवर यांनी न्यायालयात बाजू मांडली की, कारण नसताना पतीला कोर्टात खेचल्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा वाया गेला आहे. त्यामुळे जर पत्नीला घटस्फोट हवा असेल, तर तिनेच पतीला खटल्याचा खर्च म्हणून ५० हजार रुपये द्यावेत.
advertisement
न्यायालयाचा निकाल
पूजाने ही अट मान्य केली आणि पतीला ५० हजार रुपये सुपूर्द केले. त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांचा घटस्फोट मंजूर झाला. घाईघाईत आणि घरच्यांना न सांगता लग्न करणाऱ्या प्रेमी जोडप्यांसाठी ही घटना एक मोठा धडा मानली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 11:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
अजब प्रेम कहाणीचा गजब अंत! लपून कोर्ट मॅरेज केलं पण एकत्र राहण्याआधीच पुजाचं मन बदललं; घटस्फोटासाठी पुण्यातील पत्नीनंच दिले पतीला पैसे










