जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी होणार जाहीर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुंबई: राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता प्रशासन निवडणुकीच्या दृष्टीने प्राथमिक तयारीला लागलेले आहे. त्यासाठीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.
advertisement
जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी?
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकीत व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.
advertisement
जिल्हानिहाय आरक्षण :
- ठाणे- सर्वसाधारण महिला
- पालघर - अनिसूचत जमाती
- रायगड- सर्वसाधारण
- रत्नागिरी- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग- सर्वसाधारण
- नाशिक- सर्वसाधारण
- धुळे - नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- नंदुरबार- अनुसूचित जमाती
- जळगाव- सर्वसाधारण
- सातारा - नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- अहिल्यानगर- अनुसुचित जमाती (महिला)
- पुणे- सर्वसाधारण
- सांगली - सर्वसाधारण महिला
- सोलापूर- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- कोल्हापूर- सर्वसाधारण महिला
- छ. संभाजीनगर - सर्वसाधारण
- जालना- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- बीड- अनुसूचित महिला
- परभणी- अनुसूचित जाती
- नांदेड - सर्वसाधारण मागास प्रवर्ग
- धाराशिव- सर्वसाधारण (महिला)
- लातूर- सर्वसाधारण (महिला)
- अमरावती- सर्वसाधारण (महिला)
- अकोला - अनुसूचित जमाती (महिला)
- वाशिम -अनुसूचित जमाती (महिला)
- बुलढाणा -सर्वसाधारण
- यवतमाळ -सर्वसाधारण
- नागपूर -नागरिकांचा मागास प्रवर्ग
- वर्धा- अनुसूचित जाती
- भंडारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
- गोंदिया -सर्वसाधारण (महिला)
- चंद्रपूर- अनुसचित जाती (महिला)
- गडचिरोली - सर्वसाधारण (महिला)
- हिंगोली- नागरिकांचा मागास प्रवर्ग
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी होणार जाहीर