advertisement

Raigad: महाडमध्ये राडा भोवला, भरत गोगावलेंच्या मुलाची 6 तास चौकशी, कोर्टातून नवी अपडेट समोर

Last Updated:

महाड नगरपालिका राडा प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या शिवसेनेचे नेते विकास गोगावले यांच्यासह अन्य 7 जण गुरुवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली

News18
News18
मोहन जाधव, प्रतिनिधी
रायगड :  महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी अखेरीस शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले पोलिसांसमोर हजर झाले. त्यानंतर आज ६ तास  गोगावलेंची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर कोर्टात हजर केलं होतं. या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाड नगरपालिका  राडा प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या शिवसेनेचे नेते विकास गोगावले यांच्यासह अन्य 7 जण गुरुवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गोगावले पोलिसांना शरण आले. विकास गोगावले यांनी  सकाळी महाड पोलीस ठाण्यात स्वतःला आत्मसमर्पण करत कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आठ जणांना मेडिकल केल्यानंतर साडेतीन वाजता अलिबाग कोर्टात हजर करणार आलं होतं. त्यााआधी पोलिसांनी गोगावले यांची ६ तास चौकशी केली होती.
advertisement
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा पोलिसांसमोर हजर झाले होते.  शिवसेना कार्यकर्त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे कार्यकरतेही पोलिसांना शरण आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप, जगदीश पवार, धनंजय देशमुख आणि निलेश महाडिक पोलिसांसमोर हजर झाले.
न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला.   दोन्ही बाजूच्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही गटाचे आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे, अशी माहिती विकास गोगावले यांचे ॲड. सनी जाधव यांनी दिली. मात्र, राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे हे अद्यापही पोलिसांना शरण आलेलं नाहीत त्यामुळे सुशांत जाबरे यांचा पोलीस शोध घेत आहेत.
advertisement
काय आहे प्रकरण? 
नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. २ डिसेंबर २०२५ रोजी महाडमध्ये मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. तसंच रिव्हॉल्व्हर रोखल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
advertisement
या प्रकरणी   महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्यावर कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून विकास गोगावले फरार होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांनी पोलिसांत हजर होऊन जामीन मिळवणे अपेक्षित होते, मात्र ते अनेक दिवस फरार राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.
कोर्टाने फटकारलं
दरम्यान, गुरुवारी 22 जानेवारी रोजी हायकोर्टाने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं. एक मुख्यमंत्री इतका हतबल कसा काय झाला? एका मंत्र्याच्या मुलाला अटक करू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. यानंतर शुक्रवारी सकाळी विकास गोगावले महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raigad: महाडमध्ये राडा भोवला, भरत गोगावलेंच्या मुलाची 6 तास चौकशी, कोर्टातून नवी अपडेट समोर
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement