कोल्हापूर : ऑफिसमधला ताण, मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घालवलेले तास, चुकीच्या पद्धतीनं बसणे, झोपणे आणि व्यायाम न करण्याची सवय अशा कित्येक सवयी आजकालच्या तरुणाईला लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा सवयींच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईला अनेक शारिरीक आणि मानसिक आजार नकळत लागले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सर्व्हायकल स्पॉंडिलायसिस. या समस्येवर अनेक उपाय केले जातात. पण यावर दीर्घकाळ असा फरक कोणताही जाणवत नाही. कोणताही उपाय हा तात्पुरताच ठरत आहे. मुळात सर्व्हायकल स्पॉंडिलायसिस हा आजार नेमका काय आहे? त्याची कारणे काय असू शकतात? याबद्दच डॉक्टर अविनाश शिंदे यांनी माहिती दिली आहे.



