काय तो सोक्ष मोक्ष लावा! पतीला न्याय किंवा माझी डेड बॉडी घरी जाईल, परळीच्या मुंडेच्या पत्नीचा आक्रोश

Last Updated:

तब्बल 15 महिन्यापासून आरोपींना अटक न केल्यामुळे आता न्याय नाही मिळाला तर आमरण उपोषण करणार असा पवित्रा मुंडे कुटुंबाने घेतला आहे.

News18
News18
बीड :  परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात (Mahadev Munde Murder)  न्याय मिळावा यासाठी मुंडे कुटुंबाची आणि पोलीस अधिक्षकांची अखेर पाच तासानंतर भेट झाली. तब्बल 15 महिन्यापासून आरोपींना अटक न केल्यामुळे आता न्याय नाही मिळाला तर आमरण उपोषण करणार असा पवित्रा मुंडे कुटुंबाने घेतला आहे. पंधरा महिन्यानंतर वडीलाची आठवण आल्याने मुलाला अश्रू अनावर झाले.. तर ज्ञानेश्वरी यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच वडिलाची आठवण आल्याने मुलाला अश्रू अनावर झाले.
आज पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी त्या दुपारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या.तब्बल पाच तासापासून मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून होते. मात्र नवनीत कॉवत कामानिमित्त बाहेर गावी होते. ते आल्यानंतर त्यांनी मुंडे कुटुंबाची भेट घेतली. तब्बल 15 महिन्यापासून आरोपींना अटक न केल्यामुळे.. आता न्याय नाही मिळाला तर अमरण उपोषण करणार असा पवित्रा मुंडे कुटुंबाने घेतला आहे. तसेच उपोषणाला बसल्यानंतर एक तर न्याय मिळेल किंवा माझी डेड बॉडी घरी जाईल, असा टोकाचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे..
advertisement

एक तर न्याय किंवा माझी डेड बॉडी, पत्नीचा टोकाचा इशारा

पोलीस प्रशासनावरती विश्वास राहिला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी मला न्याय मिळवून द्यावा. पोलिसांना आठ दिवसाचा वेळ देणार आहे. आठ दिवसांमध्ये आरोपी अटक झाले नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल आणि उपोषण स्थळावरून एक तर न्याय मिळेल किंवा माझी डेड बॉडी घरी जाईल असा टोकाचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.
advertisement

पंकजा मुंडे भेटायला आल्या नाहीत, महादेव मुंडेंच्या पत्नीची खंत

तसेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. ही घटना घडल्यानंतर पंकजा मुंडे तर भेट घ्यायला सुद्धा आल्या नाहीत. आम्ही त्यांना किती मानतो, अशी खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काय तो सोक्ष मोक्ष लावा! पतीला न्याय किंवा माझी डेड बॉडी घरी जाईल, परळीच्या मुंडेच्या पत्नीचा आक्रोश
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement