महाराष्ट्रातील नगरसेवकांचे मानधन: 29 महानगरपालिकांमध्ये BMC च्या नगरसेवकाला सर्वाधिक मानधन, सगळ्यात कमी कुणाला?

Last Updated:

मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांना सर्वाधिक २५,००० रु. मानधन मिळते तर महाराष्ट्रातील २,८६९ नगरसेवकांसाठी वार्षिक ४० कोटींपेक्षा जास्त खर्च होतो.

News18
News18
नगरसेवक म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती पांढरीशुभ्र गाडी आणि कार्यकर्त्यांचा ताफा. पण, ज्या नगरसेवकाला आपण निवडून देतो, त्याला सरकार दरमहा किती मानधन देतं? हा प्रश्न अनेकांना पडतो. महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या उत्पन्नानुसार आणि विस्तारानुसार नगरसेवकांचे मानधन ठरलेले असते. यात देशातील सर्वात श्रीमंत पालिकेचे (मुंबई) नगरसेवक आघाडीवर असले, तरी इतर शहरांतील आकडाही कमी नाही.
'अ+' पासून 'ड' श्रेणीपर्यंत वर्गीकरण
राज्यातील महापालिकांचे वर्गीकरण 'अ+' पासून 'ड' श्रेणीपर्यंत करण्यात आले आहे. त्यानुसार नगरसेवकांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा होते. नगरसेवकांना मिळणारे मानधन जरी कमी दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्यांना मिळणारे फायदे खूप असतात. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हजेरी लावण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला ४०० रुपये स्वतंत्र मिटींग भत्ता मिळतो. राज्यात एकूण २,८६९ नगरसेवक असून, केवळ या सभेद्वारे वर्षाला १.३७ कोटी रुपये खर्च होतात.
advertisement
इतर भत्ते कोणते मिळतात?
नगरसेवकांना नवीन सिम कार्ड आणि त्यांच्या मोबाईलचे मासिक बिल संबंधित महानगरपालिकाच भरते. महापौर आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचे पेट्रोल/डिझेल आणि त्यांच्या ड्रायव्हरचा पगारही पालिकेच्या तिजोरीतूनच दिला जातो. मुंबईतील नगरसेवकाला सर्वाधिक मानधन आणि भत्ते मिळतात तर सर्वात कमी मानधन 19 महानगरपालिकांमधील नगरसेवकांना मिळतं. दुसऱ्या स्थानावर नागपूर आणि त्यानंतर पुण्याचा नंबर येतो.
advertisement
29 महानगरपालिकांसाठी किती खर्च?
महाराष्ट्रातील सर्व महापालिकांच्या एकूण २,८६९ नगरसेवकांचा विचार केला, तर त्यांच्या केवळ मानधनासाठी दरमहा ३ कोटी ३४ लाख ५५ हजार रुपये खर्च होतात. वार्षिक विचार केल्यास हा आकडा ४० कोटी १४ लाख ६० हजार रुपयांच्या घरात जातो. हा सर्व पैसा जनतेने भरलेल्या करातून (Tax) खर्च केला जातो. लोकप्रतिनिधींच्या मानधनासाठी मात्र महापालिकांच्या तिजोऱ्या नेहमीच खुल्या असतात, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
advertisement
29 महानगरपालिकांकडून नगरसेवकांना किती मानधन
महापालिकानगरसेवकमानधन
मुंबई227२५,००० रु.
नागपूर151२०,००० रु.
पुणे165२०,००० रु.
ठाणे131१५,००० रु.
पिंपरी-चिंचवड128१५,००० रु.
नाशिक122१५,००० रु.
नवी मुंबई111१०,००० रु.
कल्याण-डोंबिवली122१०,००० रु.
वसई-विरार115१०,००० रु.
छत्रपती संभाजीनगर115१०,००० रु.
उल्हासनगर78७,५०० रु.
भिवंडी-निजामपूर90७,५०० रु.
पनवेल78७,५०० रु.
मिरा-भाईंदर95७,५०० रु.
मालेगाव84७,५०० रु.
धुळे74७,५०० रु.
जळगाव75७,५०० रु.
अहिल्यानगर68७,५०० रु.
सांगली-मिरज-कुपवाड78७,५०० रु.
सोलापूर102७,५०० रु.
कोल्हापूर81७,५०० रु.
परभणी65७,५०० रु.
नांदेड वाघाळा81७,५०० रु.
लातूर70७,५०० रु.
अमरावती87७,५०० रु.
अकोला80७,५०० रु.
चंद्रपूर66७,५०० रु.
जालना65७,५०० रु.
इचलकरंजी65७,५०० रु.
advertisement
श्रेणीनुसार मानधन कसं ठरतं?
अ प्लस श्रेणी: मुंबई महानगरपालिका या श्रेणीत येते. येथील नगरसेवकांना दरमहा २५,००० रुपये मानधन दिले जाते.
अ श्रेणी: नागपूर आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश यात होतो. येथील नगरसेवकांना दरमहा २०,००० रुपये मानधन मिळते.
ब श्रेणी: ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या शहरांमधील नगरसेवकांना प्रतिमहा १५,००० रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.
advertisement
क श्रेणी: नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिका या श्रेणीत येतात. येथील लोकप्रतिनिधींना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाते.
ड श्रेणी: राज्यातील इतर १९ महानगरपालिका 'ड' श्रेणीत मोडतात. येथील १,४८२ नगरसेवकांना दरमहा ७,५०० रुपये मानधन मिळते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रातील नगरसेवकांचे मानधन: 29 महानगरपालिकांमध्ये BMC च्या नगरसेवकाला सर्वाधिक मानधन, सगळ्यात कमी कुणाला?
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement