advertisement

एकनाथ शिंदेंना केंद्रात गृहमंत्री किंवा भविष्यात पंतप्रधान..., मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून संजय राऊतांचा चिमटा

Last Updated:

एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या आहेत, हे दिल्लीतील वाटरलेल्या डोळ्यांना घाबरले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून संजय राऊतांचा चिमटा
मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून संजय राऊतांचा चिमटा
प्रशांत लिला रामदास, नवी दिल्ली :  महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीच सरकार स्थापण होणार आहे. पण मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत तर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचा. यावर एकनाथ शिंदे यांना केंद्रात गृहमंत्री किंवा भविष्यात पंतप्रधान करण्याचं आश्वासन भाजपने दिलं असावं, असा चिमटा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काढला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलतान संजय राऊत यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. तीन पक्षांच्या युतीला सैतानी बहुमतं मिळालं आहे. भाजपाला मित्र पक्ष मिळुन 140 जागा मिळाल्या आहेत. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या आहेत, हे दिल्लीतील वाटरलेल्या डोळ्यांना घाबरले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
advertisement
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या पेचावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना केंद्रात गृहमंत्री, भविष्यात पंतप्रधान करतो असं आश्वासन भाजपने दिलं असावं.त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा बनेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. पण भाजपचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. त्यांची भूमिका युज अँड थ्रो असते. त्यांनी फिरवलेल्या शब्दाचा सगळ्यात मोठा बळी आमची शिवसेना ठरली आहे. तसेच भाजप कधीच नैतिकता पाळत नाही,अशी टीका देखील राऊतांनी भाजपवर केली.
advertisement
ईव्हीएमवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल कोर्टाने सांगितले की तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही ही चुकीची माहिती आहे. आम्ही मागच्या 10 वर्षात जिंकलो तरी आणि हरलो तरी निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या असं म्हणत आहोत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदेंना केंद्रात गृहमंत्री किंवा भविष्यात पंतप्रधान..., मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून संजय राऊतांचा चिमटा
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement