Maharashtra Govt Formation : काळजीवाहू मुख्यमंत्री अॅक्टिव्ह मोडवर, महायुतीमध्येही चर्चा होणार!

Last Updated:

Maharashtra Government Formation : काळजीवाहू मुख्यमंत्री आजपासून अॅक्टिव्ह मोडवर येणार आहेत. त्यामुळे आज रखडलेल्या बैठका सुरू होणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज एकत्रित भेटणार आहेत.

आजारपणानंतर आजपासून काळजीवाहू मुख्यमंत्री अॅक्टिव्ह मोडवर, महायुतीमध्येही चर्चा होणार!
आजारपणानंतर आजपासून काळजीवाहू मुख्यमंत्री अॅक्टिव्ह मोडवर, महायुतीमध्येही चर्चा होणार!
मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून देखील ही महायुतीमधील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी स्थापनेचा दावा अद्याप करण्यात आला नाही. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली. महायुतीमधील खाते वाटपावर आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून अॅक्टिव्ह मोडवर येणार आहेत. त्यामुळे आज रखडलेल्या बैठका सुरू होणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज एकत्रित भेटणार आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री आजपासून ॲक्टीव्ह मोडमध्ये येणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही एकत्र येणार आहेत. शासकीय बैठकांसोबतच या तिघांमध्ये राजकीय चर्चा होणार आहेत. मागील 4 दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या.
advertisement

 आज होणार महायुतीच्या नेत्यांची बैठक

आज महायुतीचे तिन्ही महत्वाचे नेते एकत्र बसणार आहेत. उद्या भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदासोबतच मंत्रीमंडळ विस्तारा संदर्भात या तिघांमध्ये चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू गिरीष महाजन यांनी शिंदेंची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर सर्व काही आलबेलं असल्याचे त्यांनी सांगितले. आजपासून एकनाथ शिंदे सक्रीय दिसतील असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला होता. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये तिघांची भेट होणार आहे.
advertisement

गिरीश महाजनांची शिष्टाई

भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. शपथविधीसाठी अवघे 48 तास शिल्लक असताना आता हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप आमदारांची विधिमंडळ नेता निवडण्यासाठी 4 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. महायुतीत मंत्रिपदांचे व खात्यांचे वाटप याबाबतचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री ठाण्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt Formation : काळजीवाहू मुख्यमंत्री अॅक्टिव्ह मोडवर, महायुतीमध्येही चर्चा होणार!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement