Maharashtra Govt Formation : महायुतीतील 'गृह' कलह संपला! शिंदे होणार उपमुख्यमंत्री, कोणत्या खात्यांवर झाली डील?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Government Formation : राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात गृह खाते हे शिवसेनेकडे असावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावर आता तोडगा निघाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील मागील 12 दिवसांपासून सत्ता वाटपाचा तिढा सुरू होता. अखेर मंगळवारी रात्री हा तिढा सुटला असल्याची चर्चा आहे. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात गृह खाते हे शिवसेनेकडे असावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावर आता तोडगा निघाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या विधीमंडळ गटाची आज बैठक होणार असून गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चर्चा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार आहे.
महायुतीमधील सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने मंगळवारी सायंकाळनंतर मोठ्या घडामोडी घडल्या. काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप विधीमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत गट नेत्याची निवड झाल्यानंतर महायुतीकडून तातडीने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. महायुतीचे नेते दुपारीच राज्यपालांची भेट घेणार आहेत.
advertisement
शिंदे-फडणवीसांमध्ये 6 दिवसांनी भेट...
निवडणूक निकालानंतर 6 दिवसानंतर काळजीवाहू मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. 'वर्षा' बंगल्यावर बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं बैठक झाली. खाते वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गृह खात्यावरील दावा सोडला?
या बैठकीनंतर शिवसेनेने गृह खात्यावरील आपला दावा सोडला असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांना गृह ऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिलं जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत 20 हून अधिक मंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 7:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt Formation : महायुतीतील 'गृह' कलह संपला! शिंदे होणार उपमुख्यमंत्री, कोणत्या खात्यांवर झाली डील?


