Devendra Fadnavis: शिंदेंचे 2 फायरब्रँड आमदार फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर हालचालींना वेग
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Government Formation Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे दोन फायरब्रँड नेते सागर बंगल्यावर दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी शिंदे गटाचे आमदार आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर तिढा सुरू झाला आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे दोन फायरब्रँड नेते सागर बंगल्यावर दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी शिंदे गटाचे आमदार आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच...
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली तरी चालेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतली. तर, शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह सुरू आहे. त्यामुळेच महायुतीत तिढा असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपल्या गटनेत्याची निवड केली आहे. तर, भाजपने अद्यापही आपला गटनेता निवडला नाही. दुसरीकडे भाजपकडून शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात दुसरी ऑफर दिली आहे.
advertisement
शिंदे गटाचे आमदार सागर बंगल्यावर...
या सगळ्या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. आमदार गुलाबराव पाटील आणि सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील अद्याप समोर आला नाही. त्यामुळे शिंदेंचे हे दोन आमदार सागर बंगल्यावर का दाखल झाले, याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
भाजपचा शिंदेंना अल्टिमेटम...
भाजपने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 72 तासांची मुदत दिली आहे. भाजपने शिवसेना शिंदे गटाला केंद्रात मंत्रीपद अथवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. दोन्हीपैकी एकाची निवड करा, असा निरोप भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे यांचही नाव चर्चेत आहे. आता, भाजपच्या ऑफरवर एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement
इतर महत्त्वाची बातमी :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2024 12:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis: शिंदेंचे 2 फायरब्रँड आमदार फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर हालचालींना वेग


