चार चाकी शिकण्यासाठी राज्य सरकार 5 हजार देतंय, तुम्हाला माहितीये? कागदपत्रे काय लागणार?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Driver Training Financial Help Shcheme: शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून कायम परवाना मिळविलेला असेल अशा कामगारास ५ हजार मिळणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ अंतर्गत मंडळाकडे नोंदीत झालेला कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम असणार आहेत.
योजनेंतर्गत ज्या कामगारांनी आणि कामगार कुटुंबीय सदस्यांनी शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून कायम परवाना मिळविलेला असेल अशा कामगारास आणि कामगार कुटुंबीय सदस्यास कमाल रु.५०००/- पर्यंतची आर्थिक मदत लाभ म्हणून देण्याची मंडळाची ही योजना आहे.
मंडळाकडून सदरील योजना खालील नियम आणि अटीनुसार दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात येत आहे. या योजनेच्या नियम आणि अटी खालीलप्रमाणे-
advertisement
१. अर्जदाराने मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन सादर करावा.
२. अर्जदार हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदित आस्थापनेतील LIN (Labour Identity Number) धारक कामगार / कामगार कुटुंबिय असावा.
३. ऑनलाईन अर्ज सादर करताना कामगार/कर्मचान्याच्या घराजवळील किंवा कामगाराच्या आस्थापनेच्या ठिकाणापासून जवळचे कामगार कल्याण केंद्र निवडावे. (निवासस्थान असलेला जिल्हा किंवा कामाच्या ठिकाणचा जिल्हा निवडून त्यानुसार केंद्र निवडावे.)
advertisement
४. शासन मान्यताप्राप्त वाहन चालक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना रु.५०००/- किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण शुल्क जे कमी असेल ते अर्थसहाय्य मंजूर करण्यात येईल.
५. मोटार वाहन अधिनियमानुसार वाहन चालविण्याचा परवाना मिळण्यास पात्र असलेल्या कामगार अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
advertisement
६. ज्या कामगारांचे वार्षिक उत्पन्न कमाल रु.८.००.०००/- एवढे आहे. अशा पात्र कामगार व अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील)
७. सदर योजना केवळ चार चाकी (LMV) हलके वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी अनुज्ञेय राहील.
८. सदर योजनेच्या लाभासाठी पात्र प्रशिक्षणार्थीनी अर्ज करण्याच्या तारखेपासून मागील १ वर्षात विहीत प्रशिक्षण पूर्ण करुन अंतिम/पक्का परवाना मिळविलेला असणे बंधनकारक राहिल. तसेच, अर्जासोबत या विहीत कालावधीतील संबंधित शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण संस्थेची प्रशिक्षण शुल्क अदा केल्याची पावती व अंतिम/पक्क्या परवान्याची साक्षांकीत प्रत जोडणे बंधनकारक राहील.
advertisement
९. अर्जासोबत कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ओळखीचा पुरावा म्हणुन आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदार कार्ड/पासपोर्ट व वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला यापैकी एक व प्रशिक्षणार्थी कामगार कुटुंबीय असल्यस पुराव्याकरीता कुटुंबाचे रेशनकार्ड जोडणे बंधनकारक राहील.
१०. सदर योजनेकरीता शैक्षणिक पात्रता, वय व शारीरिक सक्षमता मोटर वाहन विभागाने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियम व अटीनुसार राहील.
advertisement
११. चार चाकी (LMV) हलके वाहन चालविण्यासाठी मोटर वाहन विभागाने ठरविलेले न्यूनतम वय १८ वर्षे पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे. कमाल वयोमर्यादा मोटर वाहन विभागाच्या नियमानुसार राहील.
१२. सदर योजनेचा लाभ कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगार कुटुंबियातील जास्तीत जास्त दोन सभासदांना देण्यात येईल.
१३. दिव्यांग स्वरुपातील शारीरिक योग्यतेसंबंधी मोटर वाहन विभागाने परवानगी व पक्का परवाना दिलेल्या सभासदांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
advertisement
१४. अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदारास आर्थिक सहाय्याची रक्कम एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल.
१५. साखर कारखाने बंद असलेल्या कालावधीत पगार न झाल्यास, माहे जून ऐवजी डिसेंबर महिन्याची निधी कपात ग्राह्य धरली जाईल.
१६. जे कामगार, मंडळाचा कामगार कल्याण निधी भरत होते परंतु काही अडचणीमुळे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती स्विकारली आहे अशा कामगार व त्यांच्या कुटुंबियांना व सेवेत असताना मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तसेच अडचणीमुळे बंद पडलेल्या उद्योगातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना कंपनी बंद पडलेल्या वर्षापासून तसेच सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती वा मृत्यू झाल्यापासून ३ वर्षे योजनेचा लाभ मिळेल. याकरीता स्वेच्छानिवृत्तीबाबत आस्थापनेचे पत्र / कंपनी बंद पडल्याचे कागदपत्रे किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्याचे कामगाराचे मृत्यूपत्र सोबत जोडावे लागेल.
१७. अपूर्ण अस्पष्ट व चुकीच्या, माहितीसह प्राप्त अर्ज बाद केले जातील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चार चाकी शिकण्यासाठी राज्य सरकार 5 हजार देतंय, तुम्हाला माहितीये? कागदपत्रे काय लागणार?










