advertisement

Maharashtra Guardian Minister List: पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंचा पत्ता कट, अजितदादा बीडचे पालकमंत्री

Last Updated:

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलाच फटका बसला आहे.

(धनंजय मुंडे आणि अजित पवार)
(धनंजय मुंडे आणि अजित पवार)
मुंबई :  महायुती सरकारने अखेर बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलाच फटका बसला आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.  बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहे. अजितदादांकडे बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहे.
राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बऱ्या उशिराने झाला. त्यानंतर पालकमंत्री कोण होणार, यासाठीही उशीर झाला. त्यातच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे बीडच्या पालकमंत्रिपदामुळे यादी पुन्हा रखडली, असल्याची चर्चा रंगली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडचे पालकमंत्रिपद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. अजित दादांकडे बीडसह पुण्याचंही पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.
advertisement
तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण?
गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - अजित पवार
बीड - अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - अजित पवार
बीड - अजित पवार
अमरावती - चंद्रशेखर बावनकुळे
advertisement
अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम - हसन मुश्रीफ
सांगली - चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट
जळगाव - गुलाबराव पाटील
यवतमाळ - संजय राठोड
कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला - आकाश फुंडकर
भंडारा - संजय सावकारे
> बुलढाणा - मंकरंद जाधव
advertisement
> चंद्रपूर - अशोक ऊईके
> धाराशीव - प्रताप सरनाईक
> धुळे - जयकुमार रावल
> गोंदिया - बाबासाहेब पाटील
> हिंगोली - नरहरी झिरवळ
> लातूर - शिवेंद्रसिंग भोसले
> मुंबई शहर - एकनाथ शिंदे
> नांदेड - अतुल सावे
> नंदुरबार - मानिकराव कोकाटे
> नाशिक -  गिरीश महाजन
advertisement
> पालघर - गणेश नाईक
> परभणी - मेघना बोर्डीकर
> रायगड - अदिती तटकरे
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
> रत्नागिरी - उदय सामंत
> सोलापूर - जयकुमार गोरे
> वर्धा - पंकज भोयर
> जालना - पंकजा मुंडे
सह पालकमंत्री कोण?
मुंबई उपनगर -आशिष शेलार पालकमंत्री
मुंबई उपनगर - सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
advertisement
कोल्हापूर - प्रकाश आबिटकर पालकमंत्री
कोल्हापूर - सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Guardian Minister List: पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंचा पत्ता कट, अजितदादा बीडचे पालकमंत्री
Next Article
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
  • इराणचा सर्वात मोठा इशारा!

  • एका सेकंदात संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार?

  • जगाची डिजिटल लाइफलाईन कापून टाकणारा

View All
advertisement