आजचं हवामान: मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा, 48 तास धो-धो कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांसाठी अलर्ट

Last Updated:

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत नुकसान, अहिल्यानगरमध्ये सोयाबीन व कांदा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात.

Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Update
मुंबई: मागच्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा धो धो पाऊस सुरू झाला आहे. यंदा पाऊस अति झाला आहे. त्यामुळे अनेक घरांचं, पिकांचं मोठं नुकसान झालं. ठाणे, रायगड, मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. तर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
40 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रा आज आणि उद्या म्हणजे 48 तास पाऊस राहील, त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होणार आहे. नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 48 तास अति मुसळधार ते मुसळधार पाऊस होणार आहे. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल.
advertisement
जालना, परभणीमध्ये आज हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. बीड, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, अमरावती, अकोला, धाराशीव, लातूरस नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
आता परतीचा पाऊस सुरू होणं अपेक्षित होतं मात्र पावसाचा जोर मागच्या चार दिवसांपासून वाढतच चालला आहे. मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर दुसरा कमी दाबाचा पट्टा कर्नाटकहून दक्षिणेकडे जाताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस पाहणार आहे. यंदा दिवाळीपर्यंत पाऊस राहणार की काय अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.
advertisement
अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. शेती क्षेत्रातील सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाला झाले आहे, तर कांद्याची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. कांद्याला सध्या बाजारभावही योग्य नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा साठवून ठेवला होता. मात्र, अचानक आलेल्या भरपूर पावसामुळे साठवलेला कांदा पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने वाहून गेला आहे
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा, 48 तास धो-धो कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांसाठी अलर्ट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement