advertisement

Maharashtra MLC Election: अजितदादांचे धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

Last Updated:

Maharashtra MLC Election: रविवारी भाजपने 3 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

News18
News18
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे. रविवारी भाजपने 3 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
महायुतीमध्ये भाजप 3 जागांवर लढणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे.  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत आहेत.
advertisement

राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या अमरावती मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यामुळे आता विधीमंडळात पती-पत्नी एकत्र दिसणार आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर संजय घोडके यांनी त्यांना साथ दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटकर यांच्या जागी खोडके यांना संधी मिळणार आहे. या जागेसाठी झिशान सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
advertisement
राजेश विटेकर यांच्या रिक्त जागेवर मराठा समाजाच्या उमेदवाराला संधी द्यावी असा आग्रह पक्षातील मराठा कार्यकर्त्यांनी केला होता. त्यासाठी अजित पवारांना हजारोंच्या संख्येने पत्र पाठवण्यात आली होती. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

भाजपकडून कोणाला संधी?

महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे विधान परिषद निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी: 

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra MLC Election: अजितदादांचे धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement