Maharashtra CM: महायुतीच्या शपथविधीची पहिली पत्रिका आली समोर, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Maharashtra New Cm Devendra Fadnavis :शपथविधीची पहिली पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट उल्लेख आहे. ही पहिली पत्रिका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहे.
Maharashtra New Cm Devendra Fadnavis : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. तत्पुर्वी या शपथविधीची पहिली पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट उल्लेख आहे.या पत्रिकेचा फोटो आता समोर आला आहे.
महायुतीच्या शपथविधी सोहळा उद्या गुरूवारी सायंकाळी पार पडणार आहे.या शपथविधी सोहळ्याचा पहिली निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याचसोबत या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती छापण्यात आली आहे.यासोबत शपथविधीची तारीख आणि वेळ देखील सांगण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान आज पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची एकमताने गटनेतेपदी निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.या प्रस्तावाला गोपीचंद पडळकर (धनगर) , संजय सावकारे (SC), योगश सागर (गुजराती), संभाजी पाटील (मराठा), मेघना बोर्डीकर (महिला मराठा) सुधीर मुनगंटीवार ( कुमटी), अशोक ऊईके (आदिवासी) आशिष शेलार (मराठा मुंबई), पंकजा मुंडे (ओबीसी) अशा सर्व समाजाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना अनुमोदन केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गटनेता पदासाठी आणखी कुणाचा प्रस्ताव आहे का? अशी विचारणा आमदारांना केली.त्यानंतर आमदारांनी नाही म्हटल्यावर रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केल्याची घोषणा केली आहे.
advertisement
दरम्यान आता केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत आता सरकारस्थापनेवर चर्चा केली जाईल. महायुतीच्या नेत्यांसोबत सत्तेत कुणाला किती वाटा यावर अंतिम चर्चा होणार आहे. यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत. सरकारस्थापनेचा दावा करतील. महायुतीने शपथविधीची तयारी आझाद मैदानावर केली असून पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता शपथविधी होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 12:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM: महायुतीच्या शपथविधीची पहिली पत्रिका आली समोर, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख



