Maharashtra ZP Election Result: राज्यातील12 जिल्हा परिषदांवर कोणाची सत्ता? कोण उधळणार गुलाल?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Maharashtra ZP Election Result: जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.
मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 438 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2 हजार 624 तर पंचायत समितीसाठी 4 हजार 814 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय दुखवट्यानंतर ही निवडणूक पार पडली. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, तर जानेवारी 2023 पासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्ताधारी महायुतीचा भाग बनली. राज्याच्या राजकरणात मोठी उलथापालथ झाली. या राजकीय उलथापालथीनंतर अद्याप 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्यांदाच पार पडली. त्यातून राज्यातील राजकीय पक्षांविषयी जनतेचा सध्याचा कल स्पष्ट होणार आहे . आगामी निकाल सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाचे ठरणार असून, बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर जनतेचा विश्वास नेमका कुणाकडे आहे, याचा खरा अंदाज या निकालांतून येणार आहे.
advertisement
| अ. क्र. | जिल्हा परिषद | पक्ष |
| 1 | रायगड | |
| 2 | रत्नागिरी | |
| 3 | सिंधुदुर्ग | |
| 4 | पुणे | |
| 5 | सातारा | |
| 6 | सांगली | |
| 7 | सोलापूर | |
| 8 | कोल्हापूर | |
| 9 | परभणी | |
| 10 | लातूर | |
| 11 | छ. संभाजीनगर | |
| 12 | धाराशिव |
advertisement
जनतेचा कौल कुणाला
आगामी निकाल सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाचे ठरणार असून, बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर जनतेचा विश्वास नेमका कुणाकडे आहे, याचा खरा अंदाज या निकालांतून येणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra ZP Election Result: राज्यातील12 जिल्हा परिषदांवर कोणाची सत्ता? कोण उधळणार गुलाल?








