advertisement

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाअगोदर महाविकास आघाडीचा मास्टरस्ट्रोक, शरद पवारांना देणार राज्यसभा गिफ्ट?

Last Updated:

शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत.

sharad pawar
sharad pawar

प्रशांत लिला रामादास, प्रतिनिधी

नवी दिल्ली :  अजितदादांचे अपघाती निधन, सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आणि आता राष्ट्रवादीचे विलिनीकरण दरम्यान मोठी घडामोड घडण्याची शक्यात आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार हे 2 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होत आहेत. विधानसभेत महायुतीचे पारडे जड आहे. महाविकास आघाडी एकत्रित येऊन राज्यसभेची एक जागा निवडून आणू शकते. त्यामुळे या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेसेना आणि काँग्रेस शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत अनुकूल आहे.
advertisement
शरद पवार यांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचं मत आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवरून शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. पण राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांची सध्या 'वेट अँड वॉच' ची भूमिका आहे. शरद पवार यांनी जर राज्यसभेवर जाण्यास उत्सुकता दाखवली तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण झाल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील ७ खासदार निवृत्त होणार आहे. शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत.

राष्ट्रवादी मुस्लीम उमेदवार देणार का?

शरद पवार यांच्या पक्षाचे स्वतः शरद पवार आणि खासदार फौजिया खान निवृत्त होत आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडे इतकं संख्याबळ नाही की त्यांच्या पक्षाचा कोणताही लोकप्रतिनिधी निवडून येणार नाही. मात्र, महाविकास आघाडी मिळून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडी कोण उमेदवार देणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतो.
advertisement
एक जागा सुनेत्रा पवार यांची स्वतःची आहे. राज्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मिळेल तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्याच्या संख्येचा विचार करता रिक्त झालेल्या सात जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस सुनेत्रा पवार यांच्या पक्षाला मिळणार आहे. आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं एका मुस्लिम व्यक्तीला राज्यसभेवर पाठवत आला आहे. मात्र, यावेळेस फौजिया खान निवृत्त झाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडे संख्याबळ नसल्यानं मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी देणं अशक्य आहे. मात्र, महाविकास आघाडी एकत्र येऊन मुस्लीम उमेदवार देऊ शकतात. मात्र, या जागेवर महाविकास आघाडी स्वतः शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे.
advertisement

राष्ट्रवादी कॉंग्रेसचं विलीनीकरण भाजपच्या पथ्यावर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचं विलीनीकरण झाले तर महाविकास आघाडीचा एकही खासदार राज्यसभेवर निवडून येणार नाही

महाविकास आघाडी संख्याबळ

  • काँग्रेस- 16
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - 10
  • शिवसेना (उबाठा)- 20
  • एकूणः 46
महाविकास आघाडी मिळून एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. मात्र, जर शरद पवार यांच्या पक्षाचे 10 आमदार कमी झाले तर महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही.
advertisement

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा खासदार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील पाटील यांचाही समावेश आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.
advertisement

30 खासदार यंदा राज्यसभेतून निवृत्त होणार

देशभरात भाजपचे सर्वाधिक 30 खासदार यंदा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.  राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापैकी मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत.

खासदारांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश

राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालावधीत 73 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यातील सर्वात मोठे नाव म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे. त्यांचा कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्याच कालावधीत राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाअगोदर महाविकास आघाडीचा मास्टरस्ट्रोक, शरद पवारांना देणार राज्यसभा गिफ्ट?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement