Maharashtra Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला? दिल्लीतील बैठकीत काय झालं? मोठे अपडेट आले समोर
- Published by:Suraj
Last Updated:
राज्यातील महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला आणि कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे ठरल्याची माहिती मिळतेय.
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी
दिल्ली : विधानसभा निवडणुकीनिमित्त महायुतीत जागावाटपाच्या हालचाली सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी मध्यरात्री तीन तास महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महायुतीच्या जागावाटपाबाबत आता मोठे अपडेट समोर आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या जागावाटपसंदर्भात पहाटे 2.30 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. रात्री उशिरा तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला आणि कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे ठरल्याची माहिती मिळतेय. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार भाजप सुमारे 151 जागांवर, शिवसेना 84 जागांवर आणि राष्ट्रवादी 53 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या जागावाटपाबाबत तिन्ही पक्ष लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेत घोषणा करण्याची शक्यता आहे.
advertisement
महायुतीतील तिन्ही पक्षांनी 240 जागांवर समन्वय साधल्याची माहिती आहे. जो भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर ठेवण्यात आला होता. तर ज्या 48 जागांवर समन्वय साधणे शक्य नव्हते ते काल रात्री उशिरा अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासमोर ठेवण्यात आले. रात्री उशिरा सुमारे ४ तास चाललेल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला आणि कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे ठरले आहे.
advertisement
पक्षातील सत्ताविरोध दूर करण्यासाठी त्या जागांची आपसात अदलाबदल करावी, यावरही तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाले आहे. काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार भाजप सुमारे 151 जागांवर निवडणूक लढवू शकते, तर शिवसेना 84 जागांवर आणि राष्ट्रवादी 53 जागांवर निवडणूक लढवू शकते.
advertisement
तिन्ही पक्ष लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तीन पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत हाय कमांडकडून सिग्नल नाहीच. मदारांच्या संख्येवरून नंतर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे हे ठरवलं जाणार आहे. अमित शहा यांच्याकडून तिन्ही नेत्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2024 9:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला? दिल्लीतील बैठकीत काय झालं? मोठे अपडेट आले समोर