Malegaon Girl Case: मालेगाव चिमुरडी हत्या प्रकरणी कोर्टातून मोठी अपडेट, आरोपीला न्यायालयासमोर केलं होतं हजर
- Published by:Sachin S
- Reported by:BABBU SHAIKH
Last Updated:
डोंगराळे चिमुकलीच्या अत्याचार आणि खून प्रकरण मालेगाव जिल्हा अप्पर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
मालेगाव : महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या मालेगाव डोंगराळे चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे अजूनही संतापाची लाट आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी डोंगराळे गावकऱ्यांनी लावून धरली आहे. या प्रकरणी आज मालेगाव जिल्हा अप्पर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. आरोपीला आता 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
डोंगराळे चिमुकलीच्या अत्याचार आणि खून प्रकरण मालेगाव जिल्हा अप्पर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपी विजय खैरनारची आज पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मालेगावच्या अप्पर सत्र न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला 11 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्याची रवानगी आता जेलमध्ये करण्यात आली आहे.
advertisement
पीडित कुटुंबीय आणि गावकरी आमरण उपोषणावर ठाम
दरम्यान,डोंगराळे चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मागील 3 दिवसांपासून पीडित कुटुंबीय आणि गावकरी आमरण उपोषणाला बसले आहे. आज आमरण उपोषण करीत बसलेल्या पीडित कुटुंब आणि ग्रामस्थांची तब्बल खालावली आहे. तब्येत खालावलेल्या आंदोलकांनी उपचार करून घेण्यासाठी पोलीस अधिकारी उपोषणकर्त्यांची समजूत काढत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांनी उपोषण सोडण्यासाठी चर्चा करत आहे. मात्र डोंगराळे गावचे गावकरी आंदोलनावर ठाम आहे.
advertisement
दरम्यान, या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने व्हावी असी मागणी डोंगराळे गावकऱ्यांची आहे.
या प्रकरणी आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने उज्ज्वल निकम डोंगराळे घटनेची केस लढणार आहे. त्यामुळे लवकरच पुढील सुनावणीला उज्ज्वल निकम येणार असल्याची माहिती आहे.
view commentsLocation :
Manmad,Nashik,Maharashtra
First Published :
December 01, 2025 4:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon Girl Case: मालेगाव चिमुरडी हत्या प्रकरणी कोर्टातून मोठी अपडेट, आरोपीला न्यायालयासमोर केलं होतं हजर


