advertisement

टिपू सुलतानच्या फोटोवरून राडा, हिंदू संघटनांकडून आक्षेप, अखेर मालेगावच्या उपमहापौरांनी....

Last Updated:

मालेगावमचे उपमहापौर म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शान-ए-हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता.

मालेगाव टिपू सुलतान फोटो वाद
मालेगाव टिपू सुलतान फोटो वाद
नाशिक : मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्याने मोठा वाद उफाळला होता. उपमहापौरांनी फोटो काढावा नाहीतर आम्ही स्वत: संबंधित फोटो काढू, असा इशारा हिंदू संघटनांकडून देण्यात आला होता. अखेर उपमहापौरांनी टिपू सुलतानचा फोटो हटवला आहे.
मालेगावमचे उपमहापौर म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शान-ए-हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता. याच दालनाचा फोटो समाज माध्यमांवर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. हा फोटो काढण्यात यावा, यासाठी हिंदू संघटनांनी इशारा दिला होता. तसेच राजकीय पक्षांनीही फोटो त्वरित काढण्याची मागणी केली होती.

अखेर टिपू सुलतान यांचा फोटो काढला

हिंदुत्ववादी संघटना आणि काही नगरसेवकांकडून तीव्र विरोध झाल्याने अखेर प्रशासनाने उपमहापौरांच्या दालनातील फोटो रात्रीच काढला. वाढता तणाव लक्षात घेता नगरसचिवांनी फोटो काढण्याचा निर्णय घेतला. वाद टाळण्यासाठी आम्ही टिपू सुलतानचा फोटो हटवत आहोत, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
advertisement

शिंदे गटाच्या नगरसेवकांचे आंदोलन

टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद सुरू झाल्यानंतर शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मालेगाव अतिसंवेदनशील शहर असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगून जोपर्यंत फोटो काढण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, असे सांगून महापालिकेच्या आवारात शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. उपमहापौरांच्या दालनातील फोटो तातडीने हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. हिंदू संघटनांकडून देखील इशारे मिळाल्यानंतर अखेर नगरसचिवांनी फोटो काढण्याचा निर्णय घेतला.
advertisement

भाजपकडूनही टीका

मालेगावच्या उपमहापौरांनी… हिंदू द्वेषी टिपू सुलतानचा फोटो लावला आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा गायब आहेत. आमच्या खऱ्या नायकांचा मोठा अपमान आहे. संविधानाने तुम्हाला उपमहापौर होण्याची संधी दिली. त्याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. पण त्यांना संविधानाबद्दल आदर नाही, असे भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
टिपू सुलतानच्या फोटोवरून राडा, हिंदू संघटनांकडून आक्षेप, अखेर मालेगावच्या उपमहापौरांनी....
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement