Manoj Jarange Patil : CM फडणवीसांवर तीन लाख ट्रक फुलांचा वर्षाव करू, जरांगे आणि ओएसडीमध्ये काय चर्चा झाली?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Manoj Jarange : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास दूत जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुंबईत उपोषण आंदोलन सुरू होणार असून गुलाल उधळूनच पुन्हा माघारी येणार निर्धार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर आज अंतरवाली सराटीत मोठी घडामोड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास दूत जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. l
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची हाक दिली. मुंबईत मराठा समाज उपोषण आंदोलन करणार आहे. 29 ऑगस्ट रोजी या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. मुंबईतील आंदोलनात सगळ्याच मराठ्यांनी आपले कामधंदे बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ऐन गणेशोत्सवात मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाचे वादळ धडकणार असल्याने राज्य सरकारने हालाचाली तीव्र केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे आज अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.
advertisement
मुख्यमंत्र्यांवर फुलं-गुलालाचा वर्षाव करू...
मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवातील मोर्चा मागे घ्यावा, यासाठी त्यांना आवाहन केले जात आहे. ओएसडींसोबतच्या चर्चेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी आज संध्याकाळपर्यंत मान्य करण्याची मागणी केली. जरांगे यांनी म्हटले की, आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरुन टाकतो. त्यांनी कधी इतकी फुलं बघितली नसतील, सुंगधी-विनावासाची सगळी फुलं आणतो. फडणवीस साहेबांचा बंगला नाय गुलाबाच्या पाकळ्यांनी भरुन काढला तर नाव बदलेन, असे म्हणत उगाच गोरगरीबांच्या लेकरांची का नाराजी घेता? असा सवाल केला. मला जेलमध्ये टाका, मी सडायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्हाला आरक्षण देतो, तुमच्या अंगावरचं कातडं काढून द्या, तरीही मी तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मराठ्यांना आरक्षण दिलं की मराठा समाज त्यांना आनंदाने डोक्यावर घेईल असेही त्यांनी म्हटले. सरकारकडे आज संध्याकाळपर्यंतचा वेळ असल्याचा अल्टिमेटम त्यांनी दिला.
advertisement
ओएसडींनी चर्चेनंतर काय म्हटले?
मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी म्हटले की, मी आज मनोज जरांगे दादांची भेट घ्यायला आलो. त्यांच्या मोर्चाचा मार्ग कसा आहे, याची माहिती घेण्यासाठी आलो. मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. त्यामुळे मराठा बांधवांची अडचण व्हायला नको. मुंबईला येणाऱ्या मार्गात कोणतीही अडचण मराठा बांधवांची व्हायला नको, यासाठी ही भेट घेतली असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
मराठ्यांचे वादळ धडकणार, मंत्रालयात हालचाली...
नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज मंत्रालयात पार पडणार आहे. दुपारी २ वाजता होणाऱ्या या बैठकीस उपसमितीचे अध्यक्ष आणि सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 26, 2025 1:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : CM फडणवीसांवर तीन लाख ट्रक फुलांचा वर्षाव करू, जरांगे आणि ओएसडीमध्ये काय चर्चा झाली?











