एक बॅनर बाहेर लावलं आहे, शिव्याला लक्षात ठेवत नाही, कर्तृत्वाला ठेवतो. देवेंद्र फडणवीस यांचं हे असं आहे, काडीने औषध लावणे असं आहे. उंटावरून बसून काडीने औषध लावण्याचा प्रकार आहे. आता उंटावर बसून खालच्या माणसाला औषध लागणारच नाही. जर ते उंटावरून खाली उतरले तर औषध लागेल. देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की, शिव्याने नाहीतर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. पण काय कर्तृत्व आहे फडणवीस साहेबांचं सांगाच. धनगराच्या गाडीत लाकूड घातलं. परत म्हणाल शिव्या दिल्यात. खेड्याची भाषा आहे, धनगरांना आरक्षण दिलं नाही. तुम्ही जेवढी महामंडळ उघडली एकाला रुपया दिला नाही. एकही भरती केली नाही.
आर्थिक राजधानीने ठरवलं आहे का, गरिबाच्या मराठा बांधवांचं वाटोळ करायचं आहे का, आमचा मुंबईवर काही अधिकार नाही का, आम्ही काही पैसे मागायला आलोत का, आम्ही आमचं आरक्षण घ्यायला आलो आहोत. आता ही शेवटची फाईट आहे. ते जर म्हटले तर ओबीसीमधून आरक्षण देऊ, तर आम्ही थोडी घेणार आहोत. ते काहीही बोलतील. आमचं जे आरक्षण आहे त्यानुसार आम्ही घेऊ. आता इथं बरेच जण भेटायला येतात
आता फायनल फाईट होणार आहे, आरक्षण देणार नाहीतर मी जाणार… एक तर सरकार मला मारून टाकतील. नाहीतर उपोषण करून मी मरून जाईल. पण आता फायनल फाईट होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी ठरवायचं आहे, आठमुठे पणा ठरवून निर्णय घ्यावा. मोदी आणि शहा यांनी डाग लावायचं की नाही ते ठरवायचं आहे. कारण, मराठा समाज हा महाराष्ट्राच चाक सुद्धा फिरू देणार नाही.
सरकारला मराठा समाजाचं वाटोळं करायचं म्हणून ते येत नाही. ते येतील तेव्हा येतील. आम्हाला एक दिवसाची परवानगी दिली आहे. मग कायमस्वरुपाचीही देऊ शकतात. किंवा त्यांना वेगळं काही तरी करायचं असेल. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाही. मराठा समाज हा मराठा आहे. आम्ही सरकारवर अवलंबून नाहीये. मी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. कितीही बोलायचं बोलू द्या, मराठे हे आता ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीये.
एक एक दिवस रडक्या परवानगी देतात, मराठा पोरांशी वाईट वागू नका. हॉटेल बंद ठेवू नका. शांतता आणि सयम ठेवा. एका दिवसाची परवानगी काय देतात. आता इथं आलो आहे, आरक्षण घेऊन जाणार आहे. जसंजसं होतील तशी मराठा बांधव इकडे मुंबईत येतील. तुम्ही मला जेलमध्ये टाका, गोळ्या घाला आणि गोळ्या झेला, मी मागे हटणार नाही.
पोरांना पाणी दिलं नाही, जेवायला त्रास झाले, असं असतं का, आम्ही तुमचे पाहुणे आहोत, पाव्हण्यासोबत असं कुणी करतात का, आमच्या गावाला येऊन बघा पाव्हण्यासोबत आम्ही असं करतो का. आमच्या मराठा बांधव हे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळ्याच पक्षातले आहे. मुंबईला अशी वागणूक दिली जर हे गावी घेऊन मराठा बांधव गेले तर आमदार आणि खासदारांचीही आम्ही अशी सोय करू. तुमच्या सभा होतील तेव्हा आम्ही अशीच वागणूक देई, सरकारने जर आठमुठे पणाने वागले तर काही खरं नाही.
त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवू देणार नाही, मग मराठ्यांनी ठरवलं. मराठे घुसले आणि मुंबई जामपण केली. सरकारने पण सहकार्य केलं आता आपणही सहकार्य केलं पाहिजे. दोन तासांमध्ये पोरांनी सगळ्या गाड्या ठरलेल्या ठिकाणी लावल्या आहेत.
मुंबईला पोलीस बंदोबस्ताला आहे. त्यांना त्रास द्यायचा नाही. इथं आल्यावर शौचालयाची व्यवस्था केली आहे. पण तेही बंद केली आहे. चहा आणि वडापावचे दुकानं होती तेही बंद केली. त्यामुळे सीएसटीवर पोरं बसली होती. आता पाणी प्यायला जागाच नव्हती. त्यामुळे आम्ही पोलिसांना सांगितलं. मग तुम्ही इंग्रजापेक्षाही बेकार झाले. शौचालय बंद ठेवणार, पाणी ठेवणार नाही. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, गाड्या आम्ही रस्त्यावर लावणार नाही.
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली आहे. त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी विनंती केली आहे. उद्या शनिवारच्या दिवसासाठी आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आझाद मैदान, CSMR, BMC परीसरातील गाड्या पार्किंगमध्ये नेण्याची करणार विनंती केली आहे.
आंदोलकांनी आझाद मैदान सोडून इतरत्र जावू नये यामुळे पोलिसांवर आणि पर्यायाने परिसरावर ताण येतोय.आजच्या आंदोलनामुळे मुंबईत कामाकरता अनेकांना येता आले नाही तसंच जे आले त्यांना खूप वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबईकरांना मुंबईत कामाला येणाऱ्यांना त्रास होवू नये अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबई दाखल झाले असून आझाद मैदानावर आंदोलन करत आहे. ६ वाजेपर्यंत परवानगी होती. पण आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्या शनिवारपर्यंत उपोषण करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे.
ज्योती मेटे ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंदोलन स्थळी दाखल.
आता गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं. म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम करणार होतं आणि मुंबई जाम केलं पण
आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्या बद्दल सरकारचं कौतुक केलं आहे.
सरकारने सहकार्य केलं आता तुम्हीही सहकार्य करायचं
जिथं पार्किंगची व्यवस्था असेल तिथेच गाड्या लावायच्या, एकही गाडी रस्त्यावर उभी राहाता कामा नये. पोलिसांना सहकार्य करा. तुम्ही स्वत: स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केली ती २ तासात पुन्हा रिकामी झाली पाहिजे. तुमची तक्रार माझ्या कानावर येता कामा नये. तुमच्यावर मुंबईकर किंवा भाविक नाराज झाला असं माझ्या कानावर यायला नको, जाळपोळ, दगडफेक करायची नाही. जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? असं विचारल्यावर आंदोलकांकडून हो उत्तर आलं
सरकार आणि न्यायदेवता परवानगी देईल, थोड्यावेळानं पुन्हा अर्ज करू.
आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलोया हे विसरू नका.
मी आझाद मैदानावर आहे तर तुम्ही 50 किमीवर बिनधास्त झोपा मी मॅनेज होत नाही टेन्शन घेऊ नका
शेवटी आलं तर मरण आहे भोगायला तयार आहे,
तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग दिलंय, ५-१० रुपयांत तुम्ही आझाद मैदानात येता, बिनधास्त गाड्या लावायच्या
रेल्वेनं यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो त्यामुळे तुम्हाला शरीराला सुद्धा त्रास होऊ नये याची काळजी घ्या, काहीही झालं तर समाजाला किंमत द्या. समजा मिनिटा मिनिटाला आपली खबर घेतो. आमची लेकर विजय घेऊन येतील याची त्यांना आशा आहे. गोंधळ गडबड करू नका. अधिकृत पार्किंगच्या ठिकाणी गाड्या लावा हायवेवर लावायच्या नाहीत. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी