Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या आरोपीला मुख्यमंत्रीच पाठीशी घालतायत, जरांगेंचा CM फडणवीसांवर गंभीर आरोप
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बीडमध्ये महाआक्रोश मोर्चाआधी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या आरोपींनी सांभाळू नये, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे.
Santosh Deshmukh Murder, Manoj Jarange On Devendra Fadnavis : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला पाठिशी घालण्याचं काम मुख्यमंत्री करतायत. या आरोपींना सत्ताधाऱ्यांनी लपून ठेवल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत. या मोर्चाआधी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या आरोपींनी सांभाळू नये, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे. तसेच यांना सोबत ठेवू नका मध्ये टाका. आरोपीला पाठिशी घालायचं काम मुख्यमंत्री करतायत. आरोपींना सत्ताधाऱ्यांनीच लपून ठेवलं आहे,असा आरोप जरांगेंनी फडणवीसांवर केला आहे.
advertisement
संतोष देशमुख यांच्या घरचे सगळे रडत आहेत, याचं राजकारण केलं जात आहे. त्यामुळे आधी विरोधी आणि सत्ताधारी असा भेद करणं बंद करा. संतोष भैय्यांचा खून झाला आहे, याच्यात कुणीही राजकारण करू नका. सरकारने आरोपींचा शोध लावायला पाहिजे, याच्यात हलगर्जीपणा करू नये. जातीयवाद पसरवेल असं काही करू नये, असे देखील जरांगे यांनी म्हटले आहे.
advertisement
संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या झाली असल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारलं असता मनोज जरांगे म्हणाले, इतर आरोपींचा खून झाला की नाही, हे मला माहीत नाही. पण असं असेल तर शंभर टक्के या प्रकरणात मोठे लोक असतील, अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे. इतर आरोपींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिशी घालत आहेत, सत्ताधाऱ्यांनीच आरोपींना लपवून ठेवलं आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
December 28, 2024 3:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या आरोपीला मुख्यमंत्रीच पाठीशी घालतायत, जरांगेंचा CM फडणवीसांवर गंभीर आरोप


