महापालिका मतदानाला काही तास बाकी असताना जरांगेंचा VIDEO, राजकीय पक्षांची धडधड वाढली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मतदानाला काही तास बाकी राहिलेले असताना जरांगे पाटील यांनी नवी ध्वनीचित्रफित प्रसिद्ध करून आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विविध महापालिका निवडणुकांत राजकीय पक्षांना पाठिंबा दिल्याचे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत होते. मुंबईत ठाकरेच हवेत, अशा आशयाची जरांगे पाटील यांची ध्वनीचित्रफित निवडणूक काळात वेगाने व्हायरल झाली. त्यावरून वेगवेगळे दावे केले जात असताना मतदानाला काही तास बाकी राहिलेले असताना जरांगे पाटील यांनी नवी ध्वनीचित्रफित प्रसिद्ध करून आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकीत मराठा समाज म्हणून आमचा महायुती किंवा महाविकास आघाडी असा कुणालाही पाठिंबा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. माझे जुने व्हिडीओ कुणी व्हायरल करत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.
माझ्या नावाने कुणी पत्रके प्रसिद्ध करत असतील तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. बृहन्मुंबई महापालिकेसह २९ महापालिकांत जर कुणी स्थानिक पातळीवर पाठिंबा दिला असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय असेल त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा मांडत मराठा समाजाला एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 8:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महापालिका मतदानाला काही तास बाकी असताना जरांगेंचा VIDEO, राजकीय पक्षांची धडधड वाढली









