Mahindra ने मार्केटमध्ये आणला भूकंप, एकाच महिन्यात केला रेकॉर्ड, लोकांच्या लागल्या रांगा

Last Updated:

नव्या वर्षात महिंद्राने आणलेल्या या दोन नवीन गाड्यांमुळे मार्केटमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आता, या दोन्ही गाड्यांना ग्राहकांची चांगली पसंती

News18
News18
मुंबई:  महिंद्रा आणि महिंद्रा मोटर्सने अलीकडे आपल्या नवी  XEV 9S आणि XUV 7XO या दोन दमदार अशा एसयूव्ही लाँच केल्या होत्या. नव्या वर्षात महिंद्राने आणलेल्या या दोन नवीन गाड्यांमुळे मार्केटमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आता, या दोन्ही गाड्यांना ग्राहकांची चांगली पसंती मिळाली आहे. या दोन्ही गाड्यांची आतापर्यंत 93,689 युनिटची बुकिंग झाली आहे. या गाड्यांची किंमत २०,५०० कोटी (एक्स शोरूम किंमतीनुसार) असल्याचं साांगितलं जात आहे.
नवीन वर्षांच्या सुरुवातीला महिंद्राने  XEV 9S ही ईलेक्ट्रिक एसयूव्ही आणि अलीकडे XUV 7XO ही दमदार अशी ७ सीटर एसयूव्ही लाँच केली. महिंद्राने एकाच महिन्यात दोन गाड्या लाँच करून ग्राहकांसमोर EV आणि पेट्रोल, डिझेल असा पर्याय दिला होता. त्यामुळे या दोन्ही गाड्यांसाठी जबरदस्त असा प्रतिसाद मिळाला आहे.
advertisement
XUV3XO EV सुद्धा लाँच 
महिंद्रा XEV 9S मध्ये ३ बॅटरी पर्याय दिले आहे. जे 59 kWh, 70 kWh आणि 79 kWh असे आहे. 59 kWh बॅटरी 170 kW ची पॉवर देते.  70 kWh बॅटरी 180 kW इतकी पॉवर देते तर  79 kWh बॅटरी 210 kW  इतका पिक पॉवर जनरेट करते.  महिंद्रा XEV 9S च्या केबिनमध्ये प्रशस्त अशी जागा दिली आहे. समोर आणि मागील सिटवर  4076 लिटर इतकी जागा दिली आहे. तर 527 लिटर इतका बूट स्पेस दिलाा आहे. त्यामुळे पाठीमागे बॅग ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे.
advertisement
2.2-लीटर डिझेल इंजिन
महिंद्रा XEV 9S ची किंमत 19.95 लाख रुपये (एक्स-शोरूम)पासून सुरू होते. या एसयूव्हीचं टॉप एन्ड मॉडेल 29.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकं आहे. तर महिंद्रा XUV 7XO मध्ये आधीच्या एसयूव्हीसारखचा पावरट्रेन ऑप्शन दिला आहे. यामध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 203 hp इतकी पॉवर जनरेट करेल.
सोबतच  2.2-लिटर डिझेल इंजिन पर्याय सुद्धा दिला आहे. यामध्ये 185 hp ची पॉवर दिली आहे. दोन्ही इंजिनमध्ये  6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय दिला आहे.
advertisement
XUV3XO EV हा एक स्वस्त पर्याय
तर महिंद्राने  XUV3XO EV ही एक ईलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. या एसयूव्हीच्या बेस वेरिएंट AX5 ची किंमत १३.८९ लाख रुपये आहे, तर टॉप-एंड वेरिएंट AX7L ची किंमत १४.९६ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ही किंमत कमी आहे.  महिंद्राच्या या नवीन EV ची डिलिव्हरी २३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे.
advertisement
XUV3XO EV मध्ये ३९.४ kWh चा बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीचा दावा आहे की ही SUV सिंगल चार्जमध्ये २८५ किमीची 'रियल-वर्ल्ड' रेंज (AC ऑन सह) देईल, तर सर्वाधिक रेंज ही ४५६ किमी इतका आहे. या एसयूव्हीमध्ये मोटरही १५० PS ची पॉवर आणि ३१० Nm चा टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे ही कार अवघ्या ८.३ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग गाठू शकते. तसंच,  XUV3XO EV चार्जिंगसाठी ५० kW च्या DC फास्ट चार्जर दिला आहे, ज्यामुळे  ही एसयूव्ही फक्त ५० मिनिटांत ० ते ८०% पर्यंत चार्ज होऊ शकते. घरी चार्ज करण्यासाठी ७.२ kW चा AC चार्जर दिला आहे, ज्यामध्ये एसयूव्ही पुर्ण चार्ज होण्यासाठी ६.५ तास लाागतो. या एसयूव्हीमध्ये सुरक्षेसाछी  लेव्हल-२ ADAS फिचर्स दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Mahindra ने मार्केटमध्ये आणला भूकंप, एकाच महिन्यात केला रेकॉर्ड, लोकांच्या लागल्या रांगा
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement